EPFO : पेन्शन योजनेमध्ये मोठा बदल , कर्मचाऱ्यांना मिळाला मोठा दिलासा !

Spread the love

कामगार मंत्रालयाच्या निवेदनानुसार कर्मचाऱ्यांच्या EPFO पेन्शन योजनेमध्ये बदल करण्यात आला आहे . या बदलामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे .प्रामुख्याने कमी सेवा असलेल्या सदस्यांना त्यांच्या ईपीएस खात्यामधून पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे .सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे पाहुयात .

EPFO चे सदस्‍य असणारे कर्मचाऱ्यांची सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधीत निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना EPFO योजना 1995 अंतर्गत जमा रक्कम काढण्याची परवानगी देण्यात आली आहे .नुकतेच ईपीएफओची सर्वोच्च संस्था सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टच्या 232 व्या बैठकीमध्ये सदर मुद्यावर सखोल चर्चा करुन सदरचा निर्णय घेण्यात आला आहे .सदर बैठकीमध्ये शिफारस करण्यात आली होती कि , EPS – 95 योजनेमध्ये सुधारणा करुन सेवानिवृत्तीच्या जवळ असणाऱ्या कर्मचाऱ्यांना जमा असलेली रक्कम काढण्याची परवानगी देण्यात यावी .

हे पण वाचा : कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यासाठी NPS योजनेमध्ये बदल !

ज्या कर्मचाऱ्यांची सेवा सहा महिन्यांपेक्षा कमी सेवा शिल्लक आहे अशा सदस्यांना त्यांच्या EPS खात्यामधुन पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे .शिवाय CBT ने 34 वर्षांपेक्षा अधिक काळ योजनेमध्ये गुंतवणुक असणाऱ्या सदस्यांना समानुपातिक पेन्शन लाभ देण्याची शिफारस करण्यात आली आहे .यामुळे सेवानिवृत्ती होणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे .

Leave a Comment