शेतकरी मित्रांनो जर तुमच्या व्यवसायाची कल्पना जबरदस्त असेल तर तुम्हाला शासनाकडून 25 लाख रुपये मिळतील .भारत हा कृषिप्रधान देश असून कृषी संबंधित व्यवसाय करून त्यातून उत्पादन काढण्याची अपारक्षमता भारतातील नागरिकांकडे आहे. जर कृषी क्षेत्रातील व्यवसायाची तुमच्याकडे मजबूत कल्पना असेल पण कमी भांडवलामुळे तुम्ही पाऊल उचलू शकत नाही तर अशावेळी शासन तुम्हाला 25 लाख रुपये देईल, कसे याबद्दल सविस्तर माहिती घेऊया.
असा अर्ज करा-
सर्वात प्रथम शासन ही योजना कृषी विद्यापीठाच्या सहकार्याने राबवत आहे व कृषी विद्यापीठाच्या सहकार्याने सुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत आहे. तरुण शेतकऱ्याचे कृषी कौशल्य वाढवणे व त्याचे आयुष्यमान उंचावणे हा या योजनेमागचा महत्वाचा हेतू आहे.तुम्ही जर शासनाने राबवलेल्या योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक असाल तर अशावेळी तुम्ही HAU वेबसाइट www.hau.ac.in वर अर्ज करू शकता.
सरकार 2 महिन्यांचे प्रशिक्षण देणार-
या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून स्टार्टअप बद्दल प्रशिक्षण सुद्धा देण्यात येणार आहे. जेणेकरून कृषी क्षेत्रामध्ये शेतकरी प्रॉडक्टचे मूल्यवर्धन, पॅकेजिंग, सर्विसिंग, प्रक्रिया आणि ब्रँडिंग इत्यादी उपाययोजना करू शकतील व आपल्या व्यवसायात सक्षम बनू शकतील. शेतकरी मित्रांनो 25 लाख रुपये ही मोठी रक्कम आहे एवढ्या पैशांमधून शेतकरी फक्त आपला व्यवसाय उभा करू शकत नाही तर लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देऊ शकतात.
या श्रेणींमध्ये व्यवसाय सुरू करता येतात-
शासनाचा या योजनेमागील महत्वाचा उद्देश म्हणजे कृषी क्षेत्रामध्ये नवनवीन तंत्रज्ञानाला प्रोत्साहन हन देऊन रोजगाराची निर्मिती करणे. या क्षेत्रामध्ये उद्योजकांनी आणि तरुण वर्गणी नवनवीन व्यवसायाच्या कल्पना घेऊन पुढे जावे ज्यामुळे कृषी क्षेत्रामध्ये नव्या शक्यता निर्माण होतील. अशी शासनाची इच्छा आहे. मित्रांनो जर तुम्हाला शासनाने राबवलेल्या या योजनेमध्ये सहभागी व्हायचे असेल तर. तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डिजिटल अग्रिकल्चर, ऍग्रो प्रोसेसिंग, डेअरी फार्मिंग, फिश फार्मिंग यासारख्या श्रेणीमध्ये व्यवसाय सुरू करावेत.
- एक मुलगी असेल तर प्रशासन देणार तब्बल 1 लाख रुपये; दोन मुली असतील तर किती पैसे मिळतील? पहा सविस्तर आणि अर्ज करा !
- राज्य सरकारकडुन कर्मचारी बदली धोरणांमध्ये बदल ! जाणून नविन धोरण नेमके कसे असणार
- पेन्शन संदर्भात अभ्यास समितीस कर्मचारी संघटनांकडून सादर करण्यात आलेले मुद्दे !
- Employee Pension : जुनी पेन्शनच्या प्रश्नांवर तीन पर्यायी उपाय ! जाणून घ्या सविस्तर माहीती !
- राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव 4 टक्के महागाई भत्ता लागू करणेबाबत, राज्य सरकारकडून बैठक आयोजित !