सरकारी कर्मचाऱ्यांची पुन्हा दिवाळी ! मुळ वेतनासह DA , एचआरएमध्ये मोठी वृद्धी .

Spread the love

सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये , माहे जुलै 2022 पासुन 4 टक्के वाढ जाहीर करण्यात आलेली आहे .महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना अद्याप केले नसले तरी , केंद्र सरकारप्रमाणे चार टक्के डी.ए वाढ प्रस्तावित आहे . आगामी काळामध्ये जगभरातील महागाईचा विचार केला असता , कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये भरघोस वाढ होणार आहे .

सातव्या वेतन आयोगानुसार सध्या कर्मचाऱ्यांना 38 टक्के प्रमाणे महागाई भत्ता लागु आहे , सन 2023 मध्ये महागाईची स्थिती पाहता माहे जानेवारी 2023 मध्ये महागाई भत्तात पुन्हा 4 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे .यामुळे जानेवारी 2023 मध्ये महागाई भत्ता 42 टक्क्यांपर्यंत वाढ होईल .सातव्या वेतन आयोगानुसार महागाई भत्ताच नियमानुसार डी.ए 50 टक्केपर्यंत गेल्यास , कर्मचाऱ्यांच्या मुळ वेतनामध्ये वाढ होईल व महागाई भत्ता शुन्य टक्के करण्यात येईल .

मुळ वेतन / HRA मध्ये वृद्धी –

महागाई भत्ता 50 टक्के पेक्षा अधिक झाल्यास , फिटमेंट फॅक्टर 3.68 पट नुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान मुळ वेतन 26,000/- रुपये तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे किमान मुळ वेतन 18,000/- होईल .यामुळे कर्मचाऱ्यांना मिळणारा घरभाडे भत्तामध्ये देखिल वृद्धी होणार आहे .

Leave a Comment