केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारने केली , DA मध्ये 4% वाढ ! मुख्यमंत्र्यांने केली मोठी घोषणा !

Spread the love

केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डी.ए मध्ये 4 टक्के वाढ लागु केली आहे , सदरची डी.ए वाढ केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहे जुलै 2022 पासुन लागु करण्यात आली असुन माहे सप्टेंबर महिन्याच्या वेतन देयकासोबत प्रत्यक्ष रोखीने डी.ए वाढ लागु करण्यात आली आहे . या डी.ए वाढीमुळे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा एकुण DA हा 38% झाला आहे .याच धर्तीवर इतर राज्यातील कर्मचाऱ्यांना डी.ए वाढ लागु होत आहे .

यामध्ये हरियाणा राज्य सरकारने राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये केंद्र सरकारप्रमाणे 4 टक्के वाढ करण्यात आली आहे .सदरची वाढ केंद्र सरकारप्रमाणे माहे जुलै 2022 पासुन लागु करण्यात आली असुन ,माहे ऑक्टोंबर 2022 पासुन प्रत्यक्ष रोखीने अदा करण्यात येणार आहे . तर जुलै पासुनचा महागाई भत्ता फरक माहे नोव्हेंबर महिन्याच्या वेतन देयकासोबत अदा करण्यात येणार आहे .याबाबत हरियाणा राज्याचे मुख्यमंत्री मनोहर लाल यांनी 4 टक्के डी.ए वाढीची अधिकृत्त घोषणा केली असुन राज्यातील पेन्शनधारक तसेच कुटुंबनिवृत्तीवेतनधारक कर्मचाऱ्यांना देखिल 4 टक्के डी.ए वाढीचा लाभ अनुज्ञेय करण्यात आला आहे .

या निर्णयामुळे हरीयाणा राज्यातील कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये मोठी वाढ होणार आहे .हरियाणा मध्ये निवडणुका जवळ आल्याने , कर्मचाऱ्यांच्या मागण्या लवकर पुर्ण होत आहेत .महागाई भत्ता वाढीबरोबर वाहन भत्ता मध्ये देखिल वाढ करणे प्रस्तावित असल्याने , कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये आणखीण मोठी वाढ होणार आहे .

Leave a Comment