आजच्या धावपळीच्या युगामध्ये सर्वांनाच श्रीमंत व्हायचे आहे . यासाठी सर्वजन पैशांच्या मागे धावत आहे . परंतु पैशांचे योग्य प्रकारे नियोजन न करता आल्याने जास्त पैसे कमवून देखिल श्रीमंत होता येत नाही .यासाठी पैशांचे योग्य बचत , योग्य ठिकाणी गुंतवणुक करणे अत्यंत आवश्यक आहे .आजकाल लवकर श्रीमंत व्हायच्या नादामध्ये ऑनलाईन व्यवहार प्रकारांमध्ये , अनेक फ्रॉड होत आहेत . यासाठी योग्य मार्गाने गुंतवणुक व बचत कशी करावी याबाबत सविस्तर बातमी पुढीलप्रमाणे पाहुयात .
बँकेमध्ये करा बचत –
बँकेमध्ये आपले बचत खाते असते या खात्यामध्ये काही रक्कम RD स्वरुपात गुंतवणुक करावी . जेणेकरुन आपल्याला बचतीची सवय लागते व कमीत कमी खर्च करण्याची सवय लागते . त्याचबरोबर बचत खात्यामध्ये मोठी रक्कम कधीच बचत खात्यामध्ये ठेवू नये . मोठी रक्कम जर बचत खात्यामध्ये ठेवल्यास आपल्याला केवळ 2% ते 2.80 % पर्यंतच वार्षिक व्याज मिळतो .हीच रक्कम जर मुदत ठेव ( FD ) मध्ये गुंतवल्यास आपल्याला वार्षिक 6 टक्के ते 8.50 टक्के पर्यंत वार्षिक व्याजदर मिळतो .शिवाय आपल्याला एखादी मोठी रक्कम 15-20 दिवस किंवा 1 -2 महिन्यानंतर लागणार असल्यास , अशी मोठी रक्कम त्या दिवसापर्यंत मुदत ठेव करुन चांगले व्याज मिळवू शकता .मुदत ठेव करण्यासाठी आजकाल आपल्याला बँकेत जाण्याची आवश्यक नाही . मोबाईल ऑनलाईन बँकिंगच्या सहाय्यने करु शकता .
शेअर मार्केट / म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणुक –
जर आपल्याला आपल्या गुंतवणुकीवर चांगला नफा हवा असल्यास , शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवू शकता . यासाठी आपल्याला शेअर मार्केटचे ज्ञान असणे आवश्यक आहे . शेअर मार्केटचे चांगले ज्ञान नसल्यास अपल्या जोखिमीनुसार म्यच्युअल फंड मध्ये पैसे गुंतवू शकता .म्यच्युअल फंडमध्ये SIP पद्धतीने गुंतवणुक केल्याचे अधिक फायदेशिर ठरते . यामुळे आपल्याला आपल्या गुंतवणुकीवर चांगला नफा हवा असल्यास शेअर मार्केट / म्यच्युअल फंड मध्ये पैसे गुंतवु शकता . यासाठी आपल्याला शेअर मार्केटचे ज्ञान असणे आवश्यक आहे .
क्रिप्टो करेंन्सी ( Cryptocurrency ) –
क्रिप्टो करेंन्सी मधील गुंतवणुक अधिक जोखिमीची बाब समजली जाते . परंतु यामधील गुंतवणुक करणारे गुंतवणुकदार कमी कालावधीमध्ये जास्त श्रीमंत झाल्याचे देखिल समजते . यामध्ये गुंतवणुक करण्यासाठी अधिक जोखिम घेणारे गुंतवणुकदारच यामध्ये गुंतवणुक करावी .आपल्याकडे आवश्यतेपेक्षा अधिक पैसा शिल्लक असल्यास क्रिप्टो करेंन्सी मध्ये गुंतवणुक करायला हरकत नाही .
- राज्यातील कार्यरत / सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.01.02.2023
- Top Highlights : 2022-23 बजेटमधील टॉप महत्वाच्या घोषणा !
- Ration Card Big Update : रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी! आता गहू तांदळा सोबत मिळतील 5 हजार रुपये !
- Shivsena President : शिवसेना नक्की कोणाची? शिवसेना पक्षाच्या अध्यक्षस्थानी कोण असेल ठाकरे की शिंदे: जाणून घ्या सविस्तर !
- Business Idea : व्यवसायाची भन्नाट संकल्पना! तुमच्या गावामध्ये किंवा शहरामध्ये सुरू करा हा व्यवसाय होईल लाखोंची कमाई !