सरकारी कर्मचाऱ्यांना कोरोना कालावधी मधील 18 महिने महागाई भत्ता थांबवला होता .आता या 18 महिने कालावधीमधील डी.ए बाबत आत्ताची मोठी अपडेट समोर आलेली आहे . यामुळे कर्मचाऱ्यांना या कालावधीमधील डी. ए थकबाकी मिळण्याची आशा पुन्हा एकदा पल्लवित झालेली आहे .याबाबतची सविस्तर अपडेट पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .
केंद्रीय कामगार युनियन कडुन वारंवार सरकारला निवेदने देवून , कर्मचाऱ्यांना या अठरा महिने कालावधी मधील डी.ए बाबत तात्काळ निर्णय घेण्याची मोठी मागणी कर्मचाऱ्यांकडुन करण्यात येत असल्याने केंद्र सरकारवर कर्मचाऱ्यांचा दबाव वाढत असल्याने , केंद्र सरकारच्या कॅबिनेट मंत्रीमडळ बैठकीमध्ये 18 महिने डी.ए बाबतचा विषय चर्चेसाठी उपस्थित केला जाणार आहे .या विषयावर केंद्रीय सचिव यांच्यासोबत कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची सकात्मक बैठक संपन्न झालेली असुन , सदरचा मुद्दा कॅबिनेट बैठकीमध्ये चर्चेसाठी उपस्थित केला जाणार आहे .
केंद्रीय व राज्य कर्मचाऱ्यांना जानेवारी 2020 ते जुन 2021 या कालावधी मधील तीन हप्ते थकित महागाई भत्ता मिळालेला नाही . यावर कॅबिनेट मंत्रीमंडळ बैठकीमध्ये सकारात्मक निर्णय झाल्यास , 150,000/- रुपये 2,18,000/- पर्यंत डी.ए थकबाकी मिळेल .केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत हा निर्णय लागु झाल्यास निश्चितच इतर राज्य कर्मचाऱ्यांना देखिल 18 महिने डी.ए थकबाकीचा लाभ मिळेल .
- राज्यातील कार्यरत / सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.01.02.2023
- Top Highlights : 2022-23 बजेटमधील टॉप महत्वाच्या घोषणा !
- Ration Card Big Update : रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी! आता गहू तांदळा सोबत मिळतील 5 हजार रुपये !
- Shivsena President : शिवसेना नक्की कोणाची? शिवसेना पक्षाच्या अध्यक्षस्थानी कोण असेल ठाकरे की शिंदे: जाणून घ्या सविस्तर !
- Business Idea : व्यवसायाची भन्नाट संकल्पना! तुमच्या गावामध्ये किंवा शहरामध्ये सुरू करा हा व्यवसाय होईल लाखोंची कमाई !