महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन ( Old Pension ) लागु करणेसंदर्भात , मुख्यमंत्री सचिवालय यांचे महत्वपुर्ण पत्र निर्गमित ! दि.01.11.2022

Spread the love

महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करणे संदर्भात मुख्यमंत्री सचिवालय कक्ष औरंगाबाद विभाग यांच्यामार्फत राज्याचे मा.प्रधान सचिव मुख्यमंत्री सचिवालय मंत्रालय ,मुंबई यांना दि.01 नोव्हेंबर 2022 रोजी एक महत्वपुर्ण पत्र सादर करण्यात आले आहे . या संदर्भातील मुख्यमंत्री सचिवालय कक्ष औरंगाबाद विभाग यांचे सविस्तर पत्र पुढीलप्रमाणे पाहुयात .

या पत्राचा विषय पश्चिम बंगाल , राजस्थान ,छत्तीसगढ , झारखंड व पंजाब या पाच राज्याप्रमाणे महाराष्ट्रातही जुनी पेन्शन याजना पुर्ववत लागु करणेबाबत असा आहे .या पत्राला श्री.शेख अब्दुल रहीम राज्य प्रवक्ता महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना यांनी दिलेल्या निवेदनाचा संदर्भ देण्यात आला आहे .सदर निवेदनाद्वारे पश्चिम बंगाल , राजस्थान , झारखंड ,छत्तीगढ व पंजाब या पाच राज्याप्रमाणे महाराष्ट्रतही जुनी पेन्शन योजना पुर्ववत लागु करणेबाबत विनंती केली आहे .अन्यथा महाराष्ट्रातील लाखो कर्मचारी लोकशाही मार्गाने तीव्र संघर्ष करतील याबाबत इशारा दिला आहे .

या पत्रावर राज्य सरकारच्या स्तरावर लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल . अन्यथा राज्यातील कर्मचारी राज्यव्यापी संप पुकारण्याच्या तयारीत आहेत . शिवाय महाराष्ट्र राज्य राजपत्रिक अधिकारी महासंघाने जुनी पेन्शनचा प्रश्न दि.15.11.2022 पर्यंत मार्गी लावण्याची विनंती केली आहे . अन्यथा महासंघाने देखिल तिव्र आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे . या संदर्भातील मुख्यमंत्री सचिवालय कक्ष औरंगाबाद विभागाचा सविस्तर पत्र पुढीलप्रमाणे पाहु शकता .

Leave a Comment