सध्या देशामध्ये जुनी पेन्शन योजनेचा मोठा मुद्दा चर्चेत असुन , अशा परिस्थितीमध्ये , केंद्र सरकारने आता GPF धारक सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा झटका दिलेला आहे .जीपीएफ अर्थातच भविष्य निर्वाह निधी खात्यांमध्ये जमा करण्यासाठी कमाल मर्यादा सरकारकडुन निश्चित करण्यात आली आहे .या नव्या अधिसुचनेनुसार कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक नुकसान सहन करावा लागणार आहे . या संदर्भातील नमुद अधिसुचना पुढीलप्रमाणे पाहुयात .
सरकारच्या या नविन अधिसुचनेनुसार , कर्मचाऱ्यांना आता भविष्य निर्वाह खात्यामध्ये एका वर्षामध्ये पाच लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा करता येणार नाही .यामुळे कर्मचाऱ्यांना मिळणार आर्थिक लाभ सरकारकडुन हिरावला जात आहे .या संदर्भात सरकारने अधिसुचना निर्गमित करुन केंद्र सरकार अंतर्गत येणाऱ्या कार्मिक , लोक तक्रार निवारण , पेन्शनर्स कल्याण विभागाला पत्र सादर केले आहे .यानुसार आता कर्मचाऱ्यांना आता एका वर्षांमध्ये पाच लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम आपल्या GPF खात्यामध्ये जमा करता येणार नाही .
शिवाय ज्या कर्मचाऱ्यांने या आर्थिक वर्षामध्ये पाच लाख रुपये पर्यंत रक्कम GPF खात्यामध्ये जमा केली आहे , अशा कर्मचाऱ्यांचे योगदान थांबविण्यात येणार आहे .या निर्णयामुळे कर्मचारी वर्गांमध्ये नाराजगी व्यक्त केली जात आहे .कारण कर्मचाऱ्यांना GPF खात्यावरील जमा रक्कमेवर बँक मधील मुदत ठेवीपेक्षा अधिक व्याज मिळतो .
- राज्यातील कार्यरत / सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.01.02.2023
- Top Highlights : 2022-23 बजेटमधील टॉप महत्वाच्या घोषणा !
- Ration Card Big Update : रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी! आता गहू तांदळा सोबत मिळतील 5 हजार रुपये !
- Shivsena President : शिवसेना नक्की कोणाची? शिवसेना पक्षाच्या अध्यक्षस्थानी कोण असेल ठाकरे की शिंदे: जाणून घ्या सविस्तर !
- Business Idea : व्यवसायाची भन्नाट संकल्पना! तुमच्या गावामध्ये किंवा शहरामध्ये सुरू करा हा व्यवसाय होईल लाखोंची कमाई !