Breaking News : राज्य कर्मचाऱ्यांचे प्रचलित प्रश्न मार्गी लावण्यासाठी मंत्रीमंडळ बैठकीचे नियोजन !

Spread the love

राज्य कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत , यामध्ये प्रामुख्याने जुनी पेन्शन योजनेचा मुद्दा प्रमुख ठरला आहे . कारण देशामध्ये पाच राज्यांनी राष्ट्रीय पेन्शन योजना ( NPS ) रद्द करुन पुन्हा जुनी पेन्शन योजना लागु केली आहे .यामुळे राज्य कर्मचाऱ्यांमध्ये कमालीची नाराजगी दिसुन येत आहे .यासाठी कर्मचाऱ्यांच्या मागणीवर सविस्तर चर्चा करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारची मंत्रीमंडळ बैठक लवकरच नियोजित करण्यात येणार आहे .

महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या वतीने राज्य शासनास निवेदन सादर करुन दि.15.11.2022 पर्यंत जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबत निर्णय घेण्यात यावा . अन्यथा आंदोलनाचा पवित्रा अवलंब करु असा इशारा देण्यात आलेला आहे .त्याचबरोबर राज्यातील विविध कर्मचारी संघटनांकडुन जुनी पेन्शन मागणीसह , केंद्राप्रमाणे वाढीव महागाई भत्ता , सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे ,त्याचबरोबर बक्षी समिती खंड – 2 अहवाल लागु करावी अशा विविध मागण्यांसाठी राज्य सरकारला निवेदने देण्यात आलेले आहेत . या निवेदनावर राज्य सरकारकडुन कोणताही सकारात्मक निर्णय होत नसल्याने , कर्मचारी वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण होत आहे .

शिवाय राज्यातील कर्मचारी जुनी पेन्शन योजनाच्या बाजुने सकारात्मक भुमिका मांडणाऱ्या काँग्रसचे अध्यक्ष श्री. राहुल गांधी यांच्या भारत जोडो या अभियानामध्ये सपोर्ट करत आहेत . यामुळे महाराष्ट्र राज्य सरकारकडुन कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या सोडविण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनापुर्वीच म्हणजेच दि.15.11.2022 पुर्वीच मंत्रीमंडळाची बैठक नियोजित करुन कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल .

Leave a Comment