मोठी आनंदाची बातमी ! या नियमित राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन आयोग लागु ! GR निर्गमित दि.09.11.2022

Spread the love

राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अधिपत्याखालील संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या आस्थापनेवरील नियमित अधिकारी / कर्मचारी यांना सातवा वेतन आयोग लागु करणेबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागचा दि.09.11.2022 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित झाला आहे . या संदर्भातील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात .

महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती मधील चर्मकार समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व दारिद्रय रेषेखाली जीवन जगणाऱ्या व्यक्तींना त्यांचे जीवनमान उंचाविणे , समाज प्रवाहात त्यांना मानाचे स्थान मिळविण्याच्या दृष्टीने त्यांचा शैक्षणिक , आर्थिक व सामाजिक विकास होण्याच्या दृष्टीने संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास मर्यादित मुंबई या शासन अंगीकृत उपक्रमाची स्थापना दि.01 मे 1974 रोजी कंपनी अधिनियम , 1956 नुसार करण्यात आलेली आहे . वित्त विभागाच्या दि.04.08.2021 मध्ये नमुद केल्याप्रमाणे राज्यातील सार्वजनिक उपक्रम समित्यांना लागु असलेली निकष पुर्ण केल्याने या महामंडळातील अधिकारी / कर्मचारी यांना सातवा वेतन लागु करण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती .

यानुसार संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळातील नियमित आस्थापनेवरील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना दि.01 जुलै 2021 पासुन सातव्या वेतन आयोगानुसार शासन निर्णयामध्ये नमुद केल्याप्रमाणे सुधारित वेतनश्रेणी लागु करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे . या संदर्भातील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा .

शासन निर्णय

Leave a Comment