ही शेती करून तरी बघा ! प्रति किलो दोन हजार रुपये दराने विकले जाणारे पीक ; वार्षिक होईल तीन लाखांची कमाई !

Spread the love

शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार, हल्ली बघायचे झाले तर काळाच्या ओघात शेतीमध्ये सुद्धा मोठमोठे बदल झालेले आपल्याला दिसून येत आहेत. राज्यांमधील प्रबळ शेतकरी मित्र वेगवेगळ्या प्रयोगाच्या माध्यमातून शेती करून या सोबतच शेती व्यवसाय करून लाखो रुपयांची उलाढाल करत आहेत. आपल्या राज्यामध्ये सध्या वेलची लागवड सुद्धा चांगलीच चालू आहे.

मित्रांनो आपल्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की वेलची हे पीक फक्त केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांमध्ये घेतले जाते. मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी हे पीक घेतले जाते. मात्र आता आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी सुद्धा नवनवीन प्रयोग व तंत्रज्ञानाचा अवलंब करून वेलची पीक महाराष्ट्र मध्ये घेऊन उत्पादन काढत आहेत.

विशेष सांगायचे झाले तर राज्यामधील शेतकरी बंधू-भगिनी वेलची ची शेती करून चांगली कमाई देखील करत आहेत. शेतकरी मित्रांनो जाणकार लोक सुद्धा शेतकऱ्यांना वेलची ची शेती करण्यासाठी मार्गदर्शन करत आहेत आणि ही शेती करत असताना पीक पद्धतीमध्ये मोठा बदल केला पाहिजे हे देखील ते सांगत आहेत. अशा माध्यमातून वेलचीचे पीक घेऊन शेतकरी बंधू भगिनी चांगला नफा मिळवू शकतात.

कृषी तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार वेलची लागवड करण्याकरिता तापमान हे कमीत कमी दहा डिग्री आणि जास्तीत जास्त 35 डिग्री असावे. अशा तापमानामध्ये वेलचीचे पीक वेगाने विकसित होत असते. त्यामुळे चांगले उत्पादन यातून आपल्याला मिळते. तसेच शेतकरी बंधू भगिनींना वेलची या पिकाची लागवड करायची असल्यास त्यांनी काळ्या चिकन मातीच्या जमिनीचा अवलंब करावा. अशा परिस्थितीमध्ये वेलची लागवड केली तर शेतकऱ्यांना चांगले उत्पादन प्राप्त होते.

काळी जमीन निवडत असताना एक गोष्ट लक्षात घ्यावी. ती म्हणजे काळ्या जमिनीतून पाण्याचा निचरा व्यवस्थितपणे व्हावा. मित्रांनो आपल्या माहितीसाठी आम्ही सांगू इच्छितो की वेलची ची रोपे तयार करून मग त्यांची लागवड केल्यास 90 ते 100% झाडांची वाढ होण्यास मदत होते. यासाठी रोपवाटिकेमध्ये वेलची ची रोपे तयार केली जातात. अनुभवी लोकांच्या मते एक हेक्टर वरती वेलचीचे रोप तयार करायचे असेल तर वेलचीचे एक किलो बियाणे पुरेसे आहे.

वेलचीची लागवड केल्यानंतर जवळपास दोन वर्षानंतर या पिकापासून आपल्याला उत्पादन मिळते. कृषी क्षेत्रामधील अनुभवी लोकांनी सांगितल्यानुसार वेलची या पिकाची योग्य काळजी घेतल्यास यासोबतच वेळोवेळी योग्य ते व्यवस्थापन केल्यास प्रति हेक्टर मागे 150 किलो वेलचीचे उत्पादन आपल्याला मिळत असते.

मित्रांनो वेलचीची शेती खरोखरच शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. कारण की ही वेलची बाजारामध्ये अतिशय जास्त दराने विकली जाते. बाजारात वेलचीला 1000 ते 2000 रुपये पर्यंतचा भाव प्रति किलो मागे मिळत आहे. जर शेतकरी बंधू-भगिनींनी योग्य ती काळजी घेतली तर त्यांना एक हेक्टर क्षेत्रामधून वेलचीची शेती करून जवळपास तीन लाख रुपयांची कमाई होऊ शकते. ही तीन लाख रुपयांची कमाई वार्षिक आपल्याला मिळू शकते. त्यामुळे योग्य ते नियोजन व योग्य ती पद्धत वेलचीच्या शेतीमध्ये अवलंबली तर खरोखर आपण चांगल्या नफ्यामध्ये असणार आहोत.

Leave a Comment