HDFC बँक ही खाजगी क्षेत्रामध्ये भागभांडवलीच्या दृष्टीने देशामध्ये अव्वल स्थानावर येते .या बँकेकडुन विविध योजनांना अर्थ सहाय्य करण्यात येते .या बँकेमार्फत गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देखिल देण्यात येते .अशाचप्रकारे HDFC बँकेने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक खास ऑफर आणली आहे . ती म्हणजे कमी व्याजदरामध्ये 50 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करुन देण्यात आले आहे . HDFC बँकेच्या वैयक्तिक कर्जाविषयी संपुर्ण माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात .
पात्रता – केंद्र / राज्य शासन सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांना वैयक्तिक कर्ज उपलब्ध करुन देण्यात आले आहे . यासाठी कर्मचाऱ्यांचे किमान वय 21 वर्षे पुर्ण असणे आवश्यक आहे . त्याचबरोबर सदर कर्मचारी नियुक्तीच्या दिनांकापासुन किमान 2 वर्षे पुर्ण झाले असणे आवश्यक आहे .त्याचबरोबर सदर कर्मचाऱ्यांवर कोणत्याही प्रकारचे थकबाकी नसावी .असे निकष पुर्ण करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना वैयक्ति कर्ज उपलब्ध करुन देण्यात येईल .
कर्ज मर्यादा – कर्मचाऱ्यांस मिळणाऱ्या निव्वळ वेतनाच्या आधारे ( base on Net Salary ) 50,000/- ते 50 लाख रुपये पर्यंत कर्ज उपलब्ध करुन देण्यात येते .
व्याजदर – 10.50%
प्रोसेसिंग फीस ( Processing Fees ) :- कर्ज रक्कमेच्या 2.50% ( कमीत कमी 2,999/- रुपये व जास्तीत जास्त 25,000/- )
आवश्यक कागतपत्रे –
- पॅन कार्ड
- आधार कार्ड
- मागील 3 महिन्याचे वेतन प्रमाणपत्र
- मागील 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट
पात्र कर्मचाऱ्यांना त्वरीत वैयक्तिक कर्जाची रक्कम बँक खात्यामध्ये जमा केली जाते .State bank of india चे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी Personal loan चे व्याजदर 11.80% आहे . HDFC बँकेकडुन Personal Loan घेण्यासाठी आपल्या जवळच्या HDFC शाखेशी संपर्क साधावा .
- एक मुलगी असेल तर प्रशासन देणार तब्बल 1 लाख रुपये; दोन मुली असतील तर किती पैसे मिळतील? पहा सविस्तर आणि अर्ज करा !
- राज्य सरकारकडुन कर्मचारी बदली धोरणांमध्ये बदल ! जाणून नविन धोरण नेमके कसे असणार
- पेन्शन संदर्भात अभ्यास समितीस कर्मचारी संघटनांकडून सादर करण्यात आलेले मुद्दे !
- Employee Pension : जुनी पेन्शनच्या प्रश्नांवर तीन पर्यायी उपाय ! जाणून घ्या सविस्तर माहीती !
- राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव 4 टक्के महागाई भत्ता लागू करणेबाबत, राज्य सरकारकडून बैठक आयोजित !