Breaking News : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची घडीची सर्वात मोठी बातमी !

Spread the love

राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या हिरक महोत्सवाला चार वेळा आमंत्रण देवुनही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये मोठी नाराजगी दिसुन येत आहे .या कर्मचाऱ्यांच्या हिरक महोत्सवी प्रसंगी कर्मचाऱ्यांना इतर राज्यांप्रमाणे जुनी पेन्शन ( Old Pension ) योजना विषयी सखोल चर्चा करण्यात आली .

त्याचबरोबर केंद्र सरकारप्रमाणे 4 टक्के वाढीव महागाई भत्ता तसेच केंद्र सरकारप्रमाणे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्यात यावी तसेच बक्षी समिती खंड -2 अहवाल लागु करण्यात यावा अशा विविध प्रश्नांवर या महोत्सव प्रसंगी सखोल चर्चा करण्यात आली .राज्य शासनाला वेळोवेळी निवेदने देवूनही राज्य सरकारकडुन कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर कोणत्याही प्रकारचा निर्णय होत नाही . यामुळे अनेक कर्मचारी राहुल गांधी यांच्या भारत जोडो कार्यक्रमांमध्ये सहभाग घेवून आपल्या मागण्या अधिक प्रखर करत आहेत .

17 लाख राज्य कर्मचारी पुकारणार राज्यव्यापी संप –

देशामध्ये पाच राज्यांनी राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना रद्द करुन जुनी पेन्शन योजना लागु केली आहे , तर महाराष्ट्र राज्य सरकार कडुन जुनी पेन्शन योजनाबाबत कोणतेही सकारात्मक पाऊल उचलले जात नसल्याने , शिवाय राज्याचे मुख्यमंत्री यांना कर्मचारी संघटनेच्या हिरक महोत्सवाला चार वेळा पाचारण देवूनही उपस्थिती न दर्शविल्याने , राज्यातील 17 लाख कर्मचारी जुनी पेन्शन या प्रमुख मागणीसाठी राज्यव्यापी संप पुकारणार आहेत .

Leave a Comment