Breaking News : हिवाळी अधिवेशनांमध्ये जुनी पेन्शन योजना व 4% DA वाढ बाबत निर्णय होण्याची दाट शक्यता !

Spread the love

महाराष्ट्र राज्य शासनाचे पुढील महिन्यामध्ये दि.19 डिसेंबर पासुन नागपुर येथे हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे .या हिवाळी अधिवेशानाचे वेळापत्रक संसदीय कार्य विभागांकडुन जाहीर करण्यात आले आहेत .या अधिवेशानांमध्ये विविध विषय मार्गी लावण्यात येते .यामध्ये कर्मचाऱ्यांच्या बाबतीत बऱ्याच दिवसांपासुन प्रलंबित असणाऱ्या जुनी पेन्शन योजनाबाबत सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे .

अधिवेशनांमध्ये महाराष्ट्र संसदेचे विधानसभा सदस्य तसेच विधानपरिषदेचे सदस्य देखिल उपस्थित असतात . यामुळे विधानपरिषदेचे शिक्षक आमदार नेहमीच कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेचा आग्रह करतात . देशांमध्ये पाच राज्यांनी जुनी पेन्शन ( Old Pension ) चालु केल्याने , महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झालेला आहे .शिवाय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या भारत जोडो या अभियानांला महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांचा मोठा पाठिंबा मिळत असल्याने , कर्मचाऱ्यांच्या मागणींवर राज्य सरकारकडुन दखल घेण्यात येईल .

महाराष्ट्र शासनाच्या हिवाळी अधिवेशनाचे कामकाज दि.19 डिसेंबर 2022 ते 30 डिसेंबर 2022 या कालावधीमध्ये सुरु असणार आहे .यामध्ये विविध शासकीय कामकाज , अशासकीय कामकाज ,तसेच पुरवणी मागणींवर चर्चा अशा विविध विषयांवर चर्चा करुन सकारात्मक निर्णय घेण्यात येणार आहे .यामध्ये कर्मचाऱ्यांच्या मागणींचा देखिल विचार करण्यात येईल .

जुनी पेन्शन हा राज्य कर्मचाऱ्यांचा प्रमुख मुद्दा ठरला असल्याने , या मागणीबाबत राज्यातील कर्मचारी लवकरच संपावर जाणार असल्याची माहिती समोर आली आहे . त्याचबरोबर राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणे 4 टक्के वाढीव महागाई भत्ता जुलै 2022 पासुन लागु करणेबाबतच्या मागणींवर राज्य सरकारकडुन अधिवेशनांमध्ये सकारात्मक निर्णय होण्याची दाट शक्यता आहे .

Leave a Comment