मित्रांनो LIC च्या ह्या योजनेमध्ये एकदाच गुंतवणूक करून आयुष्यभर 74,300/- रुपये इतकी पेन्शन मिळवा !

Spread the love

नमस्कार मित्रांनो जर तुम्ही कुटुंबाचे प्रमुख सदस्य असाल तर तुमच्या कुटुंबाची काळजी घेणे तुम्हाला बंधनकारक आहे. अशा परिस्थितीमध्ये जीवन विमा मिळवणे हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. जीवन विमा यामध्ये थोडीफार गुंतवणूक करून तुम्ही त्यातून पुढे चांगलाच नफा मिळू शकता. या जीवन विम्याचा त्यांना चांगलाच उपयोग होणार आहे. तर मग चला मित्रांनो याबद्दल जरा सविस्तरच माहिती घेऊया.

मित्रांनो सर्वच लोकांना गुंतवणुकीचे व बचतीचे महत्त्व कोरोनाच्या कालखंडामध्ये समजलेच आहे. आपला स्वतःचा एखाद्या व्यवसाय असेल किंवा आपण नोकरदार असाल तुमच्या भविष्यासाठी तुमच्या उत्पादना मधून थोडेफार तरी पैसे वाचवणे गरजेचे आहे. पैशांची बचत करून तिची गुंतवणूक केल्यास तुम्हाला भविष्यामध्ये चांगलेच रिटर्न मिळणार आहेत. कुटुंबाची काळजी घेत तुमच्या भविष्याची सोय व्हावी याकरिता सर्वांसाठी जीवन विमा हा एक उत्तम पर्याय आहे.

जीवन विमा यामध्ये एकदा पैसे गुंतवून तुम्ही आयुष्यभर पैसे त्यातून कमवू शकता. त्यातून तुमची व तुमच्या कुटुंबाची आर्थिक प्रगती साधता येईल. कोणत्याही अडचणी शिवाय कमाई तुम्हाला हवी असेल तर तुम्ही भारतीय जीवन विमा महामंडळा च्या योजनेबद्दल माहिती घेणे गरजेचे आहे. तर मित्रांनो याबद्दलच आम्ही आजच्या लेका मध्ये संपूर्ण माहिती देणार आहोत. ज्यामध्ये तुम्ही एकदा पैसे गुंतवले की आयुष्यभर तुमची कमाई चालूच राहणार आहे.

मित्रांनो एलआयसी मध्ये एक योजना राबवण्यात आली आहे. त्या योजनेचे नाव आहे एलआयसी जीवन शांती योजना. विशेष म्हणजे ही एक नॉन लिंक केलेली योजना आहे. योजनेच्या माध्यमातून तुम्ही एकदा कमी गुंतवणूक अगदी व्यवस्थितपणे करू शकता तुम्हाला त्यातून आयुष्यभर पेन्शन ही मिळतच राहणार आहे. या योजनेबद्दल योग्य ती माहिती घेऊन तुम्ही लगेचच पेन्शन चालू करू शकता. तुमच्या गरजेनुसार किंवा तुमच्या वयानुसार पाच वर्षानंतर दहा वर्षानंतर पंधरा वर्षानंतर वीस वर्षानंतर अशा विविध पर्यायांमध्ये तुम्हाला पेन्शन मिळू शकते. जसजशी तुम्ही पुढे जात तसतशी पेन्शनची रक्कम वाढत जाते.

आता मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की पेन्शन मिळणार आहे नक्की पण गुंतवणूक किती करावी.

एलआयसी एजंट यांच्यामध्ये जर तुम्ही या योजने तुमच्या वयाच्या 45 व्या वर्षी दहा लाख रुपये गुंतवले तर त्यामधून तुम्हाला 74 हजार 300 रुपये अशी पेन्शन प्रत्येक वर्षाला मिळण्यास सुरुवात होईल. जर तुम्ही लगेच पेन्शन चालू न करता पाच वर्षानंतर दहा वर्षानंतर पंधरा वर्षानंतर वीस वर्षानंतर तुमची पेन्शन सुरू केली तर त्यांच्या अटीनुसार तुमच्या पेन्शनमध्ये आणखी वाढ होईल. एवढेच नव्हे तर तुम्हाला ही पेन्शन महिन्याला तीन महिन्याला सहा महिन्याला किंवा वर्षाला अशा आजारावरती मिळू शकते.

मित्रांनो एलआयसी ची पॉलिसी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने देखील खरेदी करू शकता. LIC जीवन शांती ही एक व्यापक पद्धतीने तयार केलेली वार्षिक योजना आहे. ज्यामध्ये व्यक्तीला किंवा त्याच्या कुटुंबालाही लाभ घेता येतो. तुम्ही कोणत्याही एलआयसी एजंट कडून एलआयसी जीवन शांती योजना बिनधास्तपणे खरेदी करू शकता. तुम्ही तुमच्या आसपासच्या एलआयसी कार्यालयामध्ये भेट देऊन तिथून माहिती घेऊन तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.

वय 30 ते 85 वर्षे असावे लागणार

भारतामध्ये कोणतीही व्यक्ती एलआयसीचा लाभ घेण्यास सुरुवात करणार असेल तर त्या व्यक्तीचे वय कमीत कमी 30 वर्षापेक्षा जास्त असावे किंवा 85 वर्षापेक्षा कमी असावे. पॉलिसी वरती तुम्ही सोयीनुसार कर्ज देखील घेऊ शकता मित्रांनो काही अडचणींमुळे पॉलिसी संबंधित काही समस्या तुम्हाला आल्या असतील किंवा पॉलिसीमध्ये तुमचे पैसे ठेवायचे नसतील तर तुम्ही तीन महिन्यानंतर कधीही पैसे रिटर्न घेऊ शकता. याकरिता कोणत्याही वैद्यकीय दस्ताऐवजी ची आवश्यकता लागत नाही. ही योजना इतकी चांगली आहे की यांच्या नियमांमधून तुम्ही चांगले रिटर्न पण मिळू शकतात किंवा मधून तुम्हाला पैशाची गरज लागली तर तुम्ही आहे ते पैसे रिटर्न पण घेऊ शकता.

Leave a Comment