राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना , महाराष्ट्र या संघटनेमार्फत राज्यातील कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना रद्द करुन जुनी पेन्शन योजना लागु करण्यात यावी . या प्रमुख मागणीसाठी आंदोलन अधिक तीव्र करण्याच्या उद्देशाने संघटनेमार्फत “ NPS हटाव सप्ताह “ आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहेत .
जुनी पेन्शन योजनेसाठी राज्य सरकारी कर्मचारी संघटनामार्फत दि. 04 व 05 नोव्हंबर 2022 रोजी मुंबईत वडाळा येथे आखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची सभा उत्कृष्ट आयोजनाव्दारे सफल संपन्न करण्यात आली आहे .त्याचबरोबर जुनी पेन्शन मागणीसाठी दि.21 सप्टेंबर 2022 रोजी बाईक रॅलीचे यशस्वी आयोजन करुन लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात आले .एवढे आंदोलन करुनही राज्य सरकारकडुन कोणत्याही प्रकारचे प्रतिसाद मिळत नसल्याने , आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय संघटनेमार्फत घेण्यात आला आहे .
NPS हटाव सप्ताह
राज्यात जिल्हा व तालुका स्तरावर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी दि.21 नोव्हेंबर 2022 पासुन दि.25 नोव्हेंबर 2022 पर्यंत “ NPS हटाव सप्ताह “ राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबविला जाणार आहे . या सप्ताहात जिल्ह्यातील सर्व महत्वाच्या प्रमुख कार्यालयांत कर्मचाऱ्यांची कार्यालयनिहाय सभा आयोजित करण्यात येणार आहे . त्याचबरोबर मध्यवर्ती ठिकाणी “ NPS हटाव सप्ताह “ मोहिमेचा प्रचार व प्रसार करणार असुन या काळामध्ये बेमुद संप देखिल आयोजित करण्यात येणार आहे .
या संदर्भातील राज्य सरकारी मध्यवर्ती संघटना , महाराष्ट्र यांचे प्रसिद्धीपत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता .

- एक मुलगी असेल तर प्रशासन देणार तब्बल 1 लाख रुपये; दोन मुली असतील तर किती पैसे मिळतील? पहा सविस्तर आणि अर्ज करा !
- राज्य सरकारकडुन कर्मचारी बदली धोरणांमध्ये बदल ! जाणून नविन धोरण नेमके कसे असणार
- पेन्शन संदर्भात अभ्यास समितीस कर्मचारी संघटनांकडून सादर करण्यात आलेले मुद्दे !
- Employee Pension : जुनी पेन्शनच्या प्रश्नांवर तीन पर्यायी उपाय ! जाणून घ्या सविस्तर माहीती !
- राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव 4 टक्के महागाई भत्ता लागू करणेबाबत, राज्य सरकारकडून बैठक आयोजित !