Breaking News : राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत वेतन /थकबाकी संदर्भात अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित !

Spread the love

राज्यातील जिल्हा परिषदेमधील कर्मचाऱ्यांचे माहे ऑक्टोंबर 2022 चे वेतन विहीत मुदतीत न करणे , उपलब्ध करुन दिलेल्या अनुदानाचा गैरवापर आणि शासनाची प्रतिमा मलिन करणे इत्यादी मुद्याबाबत खुलासा सादर करणेबाबतचा राज्यातील सर्व शिक्षणाधिकारी ( प्राथमिक विभाग ) यांना हे पत्र सादर करण्यात आले आहे .सदरचे पत्र महाराष्ट्र शासनाच्या प्राथमिक शिक्षण संचालनालय यांच्याकडुन दि.09.11.2022 रोजी निर्गमित करण्यात आले आहेत .

सन 2022-23 या आर्थिक वर्षातील माहे ऑक्टोंबर 2022 पर्यंतचे महिन्यांचे शिक्षकांचे वेतन अदा करणेसाठी मूळ मंजुर तरतुदीच्या 70 टक्के तरतुद संचालनालयस्तरावरुन वितरीत केलेले आहेत .तथापी राज्यातील जिल्हा परिषदेतील शिक्षकांचे माहे ऑक्टोबर 2022 चे अद्यापपर्यंत वेतन झालेले नाही .अनुदान पुरेशे देवूनही वेतन वेळेत झालेले नाही .संचालनालयाने वितरीत केलेल्या रकमेतून माहे फेब्रुवारी 2022 चे थकीत वेतन , सण अग्रीम , थकित महागाई भत्ता देयके , सातव्या वेतन आयोगाचा पहिला , दुसरा व तिसरा हप्ता , वैद्यकिय देयके व इतर देयके अदा केल्याचे बिम्स प्रणालीवर दिसुन येत आहे .सदर बाब गंभीर असल्याचे नमुद करण्यात आले आहे .

यामुळे शिक्षकांचे वेतन वेळेत का झाले नाहीत , शिक्षक संटनांना चुकीची कारणे सांगून संचालनालयाची व शासनाची प्रतिमा मलिन का केली याबाबत खुलासा दि.14.11.2022 पर्यंत संबंधित जिल्ह्यांच्या शिक्षणाधिकारी यांच्याकडुन आवश्यक त्या कागदपत्रासह सादर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत . या संदर्भातील प्राथमिक शिक्षण संचालनालय यांचे दि.09.11.2022 रोजीचे सविस्तर परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता .

Leave a Comment