मराठी सिनेसृष्टीमध्ये माठी हळहळ ! तुझ्यात जीव रंगला मालिकेतील अभिनेत्रीचा अपघातात मृत्यु !

Spread the love

मराठी सिनेसृष्टीमध्ये मोठी खळबळ उडाली आहे , ती म्हणजे तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री कल्याणी जाधव या अभिनेत्रीचा अपघातामध्ये मृत्यु झाला आहे .यामुळे मराठी सिनेमा सृष्टीमध्ये कल्याणी बद्दल मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहेत . कल्याणी जाधव यासंदर्भात सक्षिप्त माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात .

मराठी टिव्ही क्षेत्रामध्ये कल्याणी जाधव यांनी मोठी लोकप्रिता मिळविली होती . कल्याणी जाधव यास तुझ्यात जीव रंगला या मालिकेपासुन चांगला ट्र्रॅक मिळाला होता .या अगोदर कल्याणीने अनेक मराठी तसेच हिंदी सिनेमामध्ये छोटे रोल केले आहेत .परंतु कल्याणी जाधवला तुझ्यात जिव रंगला या मालिकेपासून मोठी लोकप्रियता मिळाली होती .कल्याणीने आपल्या कष्टातुन प्रेमाची भाकरी नावाने हालोंडी फाटा , कोल्हापुर येथे हॉटेल सुरु केले होते .हॉटेल बंद करुन कल्याणी जाधव नुकतेच घरी जात होती .

घरी जात असताना , भरधाव डंपरच्या धडकेत कल्याणी जाधव याचा जागीच दुर्देवी मृत्यु झाला आहे .यामुळे मराठी सिनेसृष्टीमध्ये मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे .यामुळे कल्याणीची प्रेमाची भाकरी शेवटी अधुरीच राहीली .

Leave a Comment