कर्मचाऱ्यांसाठी धक्कादायक बातमी ! राज्य कर्मचाऱ्यांची NPS मधील जमा रक्कम देण्यास सरकारचा नकार !

Spread the love

राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागु असणाऱ्या कर्मचाऱ्यांची जमा रक्कम परत देण्यास केंद्र सरकारने स्पष्ट नकार दिला आहे . यामुळे राज्य सरकारने कायदेशिर मार्गाने यासंदर्भात न्यायालयामध्ये कर्मचाऱ्यांच्या बाजुने भुमिका मांडणार आहेत .या संदर्भातील सविस्तर बातमी पुढीलप्रमाणे पाहुयात ..

राजस्थान , छत्तीसगढ ,झारखंड ,पंजाब अशा राज्यांनी केंद्र पुरस्कृत्त राष्ट्रीय पेन्शन योजना रद्द करुन जुनी पेन्शन योजना लागु करण्यात आली आहे .यामुळे राज्य कर्मचाऱ्यांचे राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये ( NPS ) जमा रक्कम संबंधित राज्यांनी परत मागितले असता , केंद्र सरकारने राष्ट्रीय पेन्शन योजनेतील जमा रक्कम परत देण्यास स्पष्ट नकार दिला आहे . कर्मचाऱ्यांची राष्ट्रीय पेन्शन योजनेतील जमा रक्कम राज्य शासनाच्या मागणीवर केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सितारमन यांनी नकार दर्शविला आहे . या मागणीवर त्यांनी स्पष्ट केले कि , राष्ट्रीय पेन्शन योजनेतील रक्कम राज्यांना देणे ही बाब कायद्यादृष्टीने चुकीचे आहे .

निर्मला सितारमण यांच्या स्पष्टीकरणावर छत्तीसगढ राज्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी आपली भुमिका मांडत म्हणाले कि , राष्ट्रीय पेन्शन योजनेतील जमा रक्कम कर्मचाऱ्यांचे असून , सदरची रक्कम कर्मचाऱ्यांना परत करण्याची दृष्टीने कायदेशिर न्यायालयामध्ये धाव घेणार आहोत . जेणेकरुन कर्मचाऱ्यांचे जमा रक्कम त्यांना परत करता येतील .

Leave a Comment