Good News : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना 38 टक्के डी.ए वाढ बाबत आत्ताची मोठी आनंदाची बातमी !

Spread the love

राज्य शासन सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे . ती म्हणजे राज्यातील कार्यरत शासकीय , जिल्हा परिषदा व इतर पात्र कर्मचारी त्याचबरोबर निवृत्तीवेतनधारक कर्मचाऱ्यांना केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वाढीव 4 टक्के लागु करण्यात येणार आहे . या संदर्भातील सविस्तर बातमी पुढीलप्रमाणे पाहुयात ..

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जुलै 2022 पासुन 4 टक्के डी.ए वाढ लागु करण्यात आली असुन ही वाढ प्रत्यक्ष सप्टेंबर महिन्याच्या वेतन / पेन्शन देयकासोबत अदा करण्यात येत आहे . या केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना देखिल माहे जुलै 2022 पासुन डी. ए वाढ लागु करण्याची मागणी राज्य कर्मचाऱ्यांकडुन करण्यात येत होती . डी.ए वाढीच्या मागणीसह इतरही प्रलंबित मागणसाठी राज्य कर्मचारी लवकरच संपाची तयारी करत असल्याने ,यापुर्वीच कर्मचाऱ्यांना मोठी खुशखबर मिळत आहे . राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर 4 टक्के वाढीव महागाई भत्ता बाबत येत्या हिवाळी अधिवेशात निर्णय घेण्यात येणार आहे .

या संदर्भातील वित्त विभागाकडुन प्रस्ताव सादर करण्यात आल्याची बातमी समोर येत आहे . मिडीया रिपोर्टनुसार महाराष्ट्र शासनाचे हिवाळी अधिवेशात कर्मचाऱ्यांच्या इतरही मागणीवर सकारात्मक निर्णय घेतला जाणार आहे . यामुळे राज्यातील शासकीय / निवृत्तीवेतनधारक कर्मचाऱ्यांना 4 डी.ए वाढीचा लाभ माहे जुलै 2022 पासुन थकबाकीसह लागु करण्यात येणार आहे .

Leave a Comment