राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांचे माहे ऑक्टोंबर महिन्यांचे वेतन , दिवाळी सणापुर्वीच अदा करण्याचे आदेश राज्य शासनाकडुन निर्गमित करण्यात आले होते . परंतु राज्यातील अनेक कर्मचाऱ्यांचे माहे ऑक्टोंबर महिंन्याचे वेतन शासन आदेशाप्रमाणे दिवाळीपुर्वी अदा करण्यात आले नाही . यामुळे विधान परिषद सदस्य श्री. कपिल हरिश्चंद्र पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांना एक पत्र सादर केले आहे .
राज्यातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या दिवाळीच्या वेतनासाठी कमी पडलेला अपुरा निधी उपलब्ध करुन देण्याच्या मागणीबाबत सदर पत्र राज्याचे मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री तसेच शिक्षण मंत्री यांना सादर करण्यात आले आहे . यामध्ये नमुद करण्यात आले आहे कि , राज्यातील सर्व जिल्हा परिषद शिक्षकांच्या वेतनाबाबत घेतलेल्या आढाव्यानुसार राज्यातील 19 जिल्ह्यात दिवाळीच्या वेतनासाठी तरतुद कमी पडल्याने दिवाळीपुर्वी राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन करण्याची घोषणा सरकारने केली होती , मात्र दिवाळी होवून महिना उलटत आला आहे तरी अद्याप कर्मचाऱ्यांचे वेतन झाले नाही ही गंभीर बाब आहे .
वेतन न झाल्याने शिक्षकांनी घेतलेल्या गृहकर्ज बँका सोसायट्या इ. कर्ज हप्ते भरण्यास उशीर होत असल्याने , कोणकोणत्या जिल्ह्यात निधी अपुरा पडला आहे , याबाबत माहिती घेवून संबंधित जिल्ह्यांना अपुरा निधी त्वरीत उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे .ज्याद्वारे माहे ऑक्टोबर चे वेतन होण्याचा मार्ग मोकळा होईल .या संदर्भातील दि.12.11.2022 रोजीचा पत्र पुढीलप्रमाणे पाहु शकता .

- एक मुलगी असेल तर प्रशासन देणार तब्बल 1 लाख रुपये; दोन मुली असतील तर किती पैसे मिळतील? पहा सविस्तर आणि अर्ज करा !
- राज्य सरकारकडुन कर्मचारी बदली धोरणांमध्ये बदल ! जाणून नविन धोरण नेमके कसे असणार
- पेन्शन संदर्भात अभ्यास समितीस कर्मचारी संघटनांकडून सादर करण्यात आलेले मुद्दे !
- Employee Pension : जुनी पेन्शनच्या प्रश्नांवर तीन पर्यायी उपाय ! जाणून घ्या सविस्तर माहीती !
- राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव 4 टक्के महागाई भत्ता लागू करणेबाबत, राज्य सरकारकडून बैठक आयोजित !