कर्मचाऱ्यांना मोठी खुशखबर ! थकित 18 महिने कालावधीमधील डी.ए थकबाकीची रक्कम होणार कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा !

Spread the love

कोरोना काळामध्ये कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 18 महिने गोठविण्यात आला होता . या कालावधीमध्ये कर्मचारी कामावर कार्यरत असल्याने , या कालावधी मधील महागाई भत्ता देण्यात यावा . अशी कर्मचारी युनियन कडुन आग्रही मागणी करण्यात आली आहे .किंवा याबाबत वन टाईम सेटलमेंट करण्यात यावी अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे .

सध्या गुजरात , हिमाचल प्रदशे राज्यांचे विधानसभा निवडुणकीमध्ये , कर्मचाऱ्यांच्या विविध मागणींवर प्रकाशझोत टाकण्यात येत आहेत . यामध्ये प्रामुख्याने जुनी पेन्शन व 18 महिने कालावधी मधील महागाई भत्ता थकबाकी बाबत कर्मचारी अधिक आक्रमक भुमिका घेत असल्याने , या संदर्भात केंद्र सरकारकडुन सकारात्मक निर्णय घेण्यात येणार आहे . यामध्ये जुनी पेन्शनचा मुद्दा हा राष्ट्रीय मुद्दा ठरला आहे . यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारकडुन योग्य निर्णय घेण्यात येईल . निवडणुका जवळ येत असल्याने , कर्मचारी संघटनांकडुन 18 महिने कालावधीमधील डी.ए थकबाकीचा मुद्दा अधिकच चर्चेचा विषय ठरत आहे .

18 महिने कालावधी मधील डी.ए थकबाकी / वन टाईम सेटलमेंट –

या कालावधी मधील महागाई भत्ता बाबत संपुर्ण कालावधी मधील थकबाकी किंवा वन टाईम सेटलमेंट करण्याची मागणी कर्मचारी संघटनांकडुन करण्यात येत आहेत .याबाबत केंद्रीय वित्त मंत्रालयाकडुन प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करण्यात आला आहे .डी.ए बाबत वन टाईम सेटलमेंट झाल्यास कर्मचाऱ्यांना एकदाच डी.ए मध्ये 4 ते 5 टक्के वाढ करण्यात येईल . अथवा या कालावधीमधील थकबाकी अदा करण्यात येईल .

Leave a Comment