7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी खुशखबर ! फिटमेंट फॅक्टर वाढीवर आली मोठी अपडेट , कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार इतकी वाढ !

Spread the love

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची घडीची मोठी आनंदाची अपडेट समोर आलेली आहे . ती म्हणजे सरकारी कर्मचारी वेतनाच्या फिटमेंट फॅक्टर मध्ये वाढ करण्यात येणार आहे , म्हणजेच किमान मुळ वेतनामध्ये मोठी वाढ होणार आहे .कर्मचाऱ्यांची फिटमेंट फॅक्टर वाढीची बऱ्याच दिवसांपासूनची अखेर संपणार आहे . फिटमेंट फॅक्टर बाबतची अपडेट काय आहे , ते पुढीलप्रमाणे पाहुयात ..

फिटमेंट फॅक्टर मध्ये 3.68 पट वाढ –

कर्मचारी मागणीनुसार त्याचबरोबर महागाईचा विचार केला असता तज्ञाच्या मते कर्मचाऱ्यांच्या फिटमेंट फॅक्टर मध्ये 3.68 पट वाढ करणे अपेक्षित आहे . यासाठी कामगार युनियनकडुन सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे .सध्या केंद्र सरकारी व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 2.57 पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे मुळ वेतन मिळतो . 2.57 पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा किमान मुळ वेतन ( बेसिक ) 18,000/- रुपये तर राज्य कर्मचाऱ्यांचा किमान मुळ वेतन ( बेसिक ) 15,000/- रुपये आहे .फिटमेंट फॅक्टरमध्ये 3.68 पट वाढ लागु केल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांचा किमान बेसिक हा 18,000/- रुपये वरुन 26,000/- रुपये होईल , तर राज्य कर्मचाऱ्यांचा किमान मुळ वेतन 15,000/- रुपये वरुन 21,000/- रुपये होईल .

फिटमेंट फॅक्टरची वाढ ही सातव्या वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या डी.ए वर अवलंबून असणार आहे . सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा एकुण डी.ए 38 टक्के इतका आहे . तर महागाईचा विचार केला असता माहे जानेवारी 2023 मध्ये महागाई भत्ता मध्ये आणखीण 4 ते 5 टक्के वाढ होईल . म्हणजेच एकुण महागाई भत्ता 43 टक्के होईल . फिटमेंट फॅक्टरची वाढ कर्मचाऱ्यांचा डी.ए 50 टक्के पेक्षा अधिक झाल्यास , लागु करण्यात येणार आहे .

Leave a Comment