Breaking News : कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये 6 टक्के वाढीस अखेर राज्य शासनाने दिली मंजुरी !

Spread the love

राज्यातील बस महामंडळ कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये वाढ करणेबाबतच्या प्रस्तावाला अखेर राज्य शासनाने मंजुरी दिली आहे .बस महामंडळ कर्मचाऱ्यांना सध्या मिळत असलेल्या महागाई भत्ता मध्ये राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे 34 टक्के डी.ए वाढ करण्याची मागणी बाबतचा प्रस्ताव बस महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक तथा महामंडळाचे अध्यक्ष श्री.शेखर चन्ने यांनी राज्य शासनास सादर केला होता .

सदर प्रस्तावाला राज्य शासनाकडुन लगेचच मंजुरी देण्यात आलेली आहे . यामुळे राज्यातील बस महामंडळ मधील कार्यरत कर्मचाऱ्यांना आता 34 टक्के दराने महागाई भत्ता मिळणार आहे .या महिन्याच्या वेतनापासुन सदरचा डी.ए वाढ प्रत्यक्ष रोखीने मिळणार आहे . बस महामंडळ कर्मचाऱ्यांना सध्या 28 टक्के दराने महागाई भत्ता मिळत होता , यामध्ये 6 टक्के वाढ करण्यात आल्याने , आता एसटी कर्मचाऱ्यांना एकुण 34 टक्के दराने महागाई भत्ताचा लाभ मिळणार आहे .बस महामंडळ कर्मचाऱ्यांना खुपच कमी वेतन मिळत असतो .

यामुळे बस महामंडळ मधील कार्यरत कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढीबाबत राज्य सरकारने महत्वपुर्ण निर्णय घेतला आहे . यामुळे बस महामंडळ कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये 600/- रुपये ते 2400/- रुपयांची वाढ होणार आहे .सरकारने डी.ए वाढीबाबत घेतलेल्या निर्णयामुळे एसटी कर्मचाऱ्यांकडुन राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहे .

Leave a Comment