State Employee : राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.17.11.2022

Spread the love

राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांचे कार्यमुल्यमापन अहवाल लिहिण्याबाबतची कार्यवाही दि.31 डिसेंबर पर्यंत पुर्ण करणेबाबतचा सामान्य प्रशासन विभाकडुन दि.17 नोव्हेंबर 2022 रोजी एक महत्वपुर्ण शासन निर्णय राज्य शासनाकडुन निर्गमित झाला आहे . या संदर्भातील सामान्य प्रशासन विभागाचा दि.17.11.2022 रोजीचा सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात .

राज्यातील सर्व शासकीय अधिकारी / कर्मचारी यांचे कार्यमुल्यमापन अहवाल लिहीण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना संदर्भाधीन शासन निर्णयान्वये निर्गमित करण्यात आल्या आहेत .तसेच कार्यमुल्यमापन अहवाल लिहिण्याबाबतचे वेळापत्रक निश्चित केलेले आहे . तथापि त्यानुसार कार्यमुल्यमापन अहवाल वेळेत लिहीले जात नाहीत असे शासनाच्या निदर्शनास आले आहे . यामुळे परिविक्षा कालावधी पुर्ण करणे , स्थायित्व प्रमाणपत्र , पदोन्नती , आश्वासित प्रगती योजना , 50/55 वर्षी करावयाचे पुनर्विलोकन इ.बाबी वेळेवर करणे प्रशासनास शक्य होत नाही .परिणामी पदे रिक्त राहील्याने प्रशासकीय कामकाजावर त्याचा विपरीत परिणाम होतो .

कार्यमुल्यमापनाचा कालावधी संपुर्ण प्रतिवेदन वर्ष म्हणजेच 1 एप्रिल ते 31 मार्च असा असुन त्या अनुषंगाने राज्यातील सर्व शासकीय अधिकारी / कर्मचारी यांचे कार्यमुल्यमापन अहवाल लिहीण्याबाबतची कार्यवाही प्रतिवेदन वर्षाच्या पुढील येणााऱ्या 31 डिसेंबर रोजी पुर्ण करणे आवश्यक असणार आहे .यामध्ये स्वयंमूल्य निर्धारण , प्रतिवेदन , पुनर्विलोकन आणि संस्करण ही प्रत्ये अधिकारी / कर्मचारी यांची वैयक्तिक तसेच सामुहिक जबाबतदारी असून ती अत्यंत कर्तव्यदक्षपणे पार पाडणे आवश्यक आहे .यामुळे महापारमध्ये समाविष्ट असलेल्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत 2021-22 या वर्षाचे गोपनीय अहवाल दि.31.12.2022 रोजी महापार प्रणालीत बंद करण्यात येणार आहे .

याबाबतची कार्यवाही विहीत कालावधीमध्ये करण्याची जबाबदारी संबंधित आस्थापना अधिकारी / संस्करण अधिकारी यांची असणार आहे .या संदर्भातील सामान्य प्रशासन विभागाचा दि.17.11.2022 रोजीचा सविस्तर शासन निर्णय  ( शासन निर्णय सांकेतांक क्रमांक – 202211171704548107 ) डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा .

शासन निर्णय

Leave a Comment