राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे , ती म्हणजे राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना दि.01 जुलै 2018 ते दिनांक 01 जानेवारी 2022 या कालावधीतील महागाई भत्तावाढी मंजुर करणेबाबत वित्त विभागाचा अत्यंत महत्वाचा शासन निर्णय दि.18.11.2022 रोजी निर्गमित झालेला आहे . महागाई भत्ता ( DA ) वाढ संदर्भातील सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात ..
महाराष्ट्र नागरी सेवा नियम 2019 अन्वये राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना व इतर पात्र कर्मचाऱ्यांना दि.01 जानेवारी 2016 पासुन 7 व्या वेतन आयोगाच्या आनुषंगाने सुधारित वेतन संरचना मंजुर करण्यात आलेली आहे . तथापि जे राज्य शासकीय कर्मचारी व महागाई भत्ता अनुज्ञेय असणारे इतर सर्व पात्र पुर्णकालिक कर्मचारी अद्यापही पाचव्या वेतन आयोगानुसार मंजुर वेतन श्रेणीत वेतन घेत आहेत , त्यांच्या महागाई भत्ताच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न राज्य शासनाच्या विचाराधीन होता .शासन या शासन निर्णयान्वये असे आदेश देत आहे कि , जे राज्य शासकीय कर्मचारी व महागाई भत्ता अनुज्ञेय असणारे इतर पात्र पुर्णकालिक कर्मचारी अद्यापही पाचव्या वेतन आयोगानुसार मंजूर वेतनश्रेणीत वेतन घेत आहेत .
त्याच्या मूळ वेतनावरील अनुज्ञेय भत्ताच्या दर पुढील तक्त्यानुसार सुधारित करण्यात आले आहेत .

महागाई भत्याची रक्कम प्रदान करण्या संदर्भात विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती त्याचप्रकारे यापुढे लागु असणार आहेत . या संदर्भातील वित्त विभागाचा दि.18.11.2022 रोजीचा शासन निर्णय ( शासन निर्णय सांकेतांक क्रमांक 202211181515131505 ) डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा .
- राज्यातील कार्यरत / सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.01.02.2023
- Top Highlights : 2022-23 बजेटमधील टॉप महत्वाच्या घोषणा !
- Ration Card Big Update : रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी! आता गहू तांदळा सोबत मिळतील 5 हजार रुपये !
- Shivsena President : शिवसेना नक्की कोणाची? शिवसेना पक्षाच्या अध्यक्षस्थानी कोण असेल ठाकरे की शिंदे: जाणून घ्या सविस्तर !
- Business Idea : व्यवसायाची भन्नाट संकल्पना! तुमच्या गावामध्ये किंवा शहरामध्ये सुरू करा हा व्यवसाय होईल लाखोंची कमाई !