सरकारी कर्मचाऱ्यांना नवा वेतन आयोग लवकरच लागु करण्यात येणार असून , या संदर्भात आत्ताची मोठी अपडेट समोर आली आहे .कर्मचाऱ्यांना सध्या सातव्या वेतन ( 7th pay commission ) प्रमाणे वेतन मिळत आहे .आता या वेतन आयोगामध्ये सुधारणा करण्यात येणार आहे . सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग , माहे जानेवारी 2016 पासुन लागु करण्यात आला आहे .
केंद्र सरकारच्या पे कमीशनच्या शिफारशीनुसार , सातव्या वेतन आयोगामध्ये महागाई भत्ताचा दर 50 टक्के पेक्षा गेल्यास मुळ वेतनात बदल करणे आवश्यक आहे . या शिफारशीनुसार विचार केला असता ,सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 38 टक्के दरांने महागाई भत्ता मिळत आहे .पुढील वर्षामध्ये जानेवारी व जुलैमधील डी.ए वाढचा विचार केला असता एकुण डी.ए 50 टक्केचा आकडा निश्चितच गाठणार असल्याने , कर्मचाऱ्यांना मुळ वेतनात वाढ होणे आवश्यक आहे .
फिटमेंट फॅक्टर व किमान मुळ वेतन –
केंद्रीय कर्मचाऱ्यांना सध्या 2.57 पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे महागाई भत्ता लाभ मिळत आहे , यामध्ये 3.68 पट वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने , केंद्रीय कर्मचाऱ्यांचा एकुण किमान मुळ वेतन हे 26,000/- होईल .या नव्या वेतन आयोगानुसार किमान मुळ वेतनात वाढ होईल , परंतु महागाई भत्ताचे दर परत शुन्य टक्के होईल . पण घरभाडे भत्तामध्ये निश्चितच वाढ होईल .
नवा वेतन आयोग लागु होण्यासाठी आणखीण निदान एक वर्ष बाकी असले तरी याबाबतच्या विधेयकाला मंजुरीसाठी कर्मचाऱ्यांना वाट पाहावी लागणार आहे .केंद्र सरकारने नवा वेतन लागु केल्यास , उशिरा का होईना पण राज्य कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे नवा वेतन आयोग लागु करण्यात येईल .
- एक मुलगी असेल तर प्रशासन देणार तब्बल 1 लाख रुपये; दोन मुली असतील तर किती पैसे मिळतील? पहा सविस्तर आणि अर्ज करा !
- राज्य सरकारकडुन कर्मचारी बदली धोरणांमध्ये बदल ! जाणून नविन धोरण नेमके कसे असणार
- पेन्शन संदर्भात अभ्यास समितीस कर्मचारी संघटनांकडून सादर करण्यात आलेले मुद्दे !
- Employee Pension : जुनी पेन्शनच्या प्रश्नांवर तीन पर्यायी उपाय ! जाणून घ्या सविस्तर माहीती !
- राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव 4 टक्के महागाई भत्ता लागू करणेबाबत, राज्य सरकारकडून बैठक आयोजित !