विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर : शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी निधींचे थेट हस्तांतरण ! GR निर्गमित .

Spread the love

विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी आत्ताची मोठी आनंदाची खुशखबर समोर आलेली आहे . ती म्हणजे राज्यातील विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकारांकडुन घेतलेले कर्ज अदा करण्यासाठी निधी वितरीत करण्यास अखेर राज्य शासनाने मान्यता दिली आहे . या संदर्भात सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाचा सविस्तर दि.18.11.2022 रोजी निर्गमित झालेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात .

विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकारांकडुन घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी सन 2022-23 या आर्थिक वर्षात पुरक मागणीद्वारे मंजूर तरतुदीमधून रुपये 4,28,59,000/- इतका निधी वितरीत करण्यास सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाचा या निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे .यामध्ये जिल्हास्तरीय समितीने विदर्भ व मराठवाड्यातील 14 जिल्ह्यांतील 3749 कर्जदार शेतकऱ्यांनी घेतलेली रक्कम रुपये 9.04 कोटी कर्जमाफीसाठी पात्र असल्याची शिफारस केली आहे . यानुसार सन 2021-22 या आर्थिक वर्षात 3.75 कोटी इतकी रक्कम सन 2022-23 या आर्थिक वर्षात रुपये 1 कोटी वितरीत करण्यात आली आहे .

अशाप्रकारे एकुण 4.75 कोटी इतकी रक्कम वितरीत करण्यात आली आहे . तर उर्वरित 4,28,59,000/- इतका निधी वितरीत करण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती , या निर्णयान्वये सदरचा निधी वितरीत करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे .या निर्णयामुळे राज्यातील विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे . या संदर्भातील सहकार व पणन विभागाचा सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता .

Leave a Comment