महाराष्ट्र राज्याचे येत्या 19 डिसेंबर पासुन हिवाळी अधिवेशन नागपुर येथे होणार आहे . या अधिवेशनामध्ये कोणते विषय चर्चेला जाणार आहेत , याबाबत महाराष्ट्र सविचालय कक्षाकडुन वेळापत्रक व विषय जाहीर करण्यात आले आहेत . या अधिवेशनांमध्ये राज्यातील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागणीवर मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तविली जात आहेत .
यामध्ये प्रामुख्याने सन 2005 नंतर राज्य शासन सेवेत रुजु झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागु करणेबाबत सकारात्मक निर्णय होण्याची दाट शक्यता आहे . कारण अधिवेशनांमध्ये विधानपरीषदेचे सदस्य यामध्ये शिक्षक आमदार यांच्याकडुन जुनी पेन्शनचा मुद्दा जोर धरला जावू शकतो . त्याचबरोबर सध्या राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रेमध्ये राज्यातील विविध कर्मचारी राहुल गांधी यांना भेटुन जुनी पेन्शन परत सुरु करण्याची मागणी केली आहे . यामध्ये अधिवेशनांमध्ये काँग्रस पक्षाचे सदस्य जुनी पेन्शन मागणीवर अधिकच जोर धरणार आहेत .
महागाई भत्ता 38 टक्के –
केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातील कर्मचाऱ्यांना माहे जुलै 2022 पासुन महागाई भत्ता थकबाकीसह 4 टक्के डी.ए वाढ करणेबाबत मोठा निर्णय अधिवेशात घेण्यात येईल . यामुळे राज्यातील शासकीय ,जिल्हा परिषद व इतर पात्र कर्मचारी त्याचबरोबर निवृत्तीवेतधारक कर्मचाऱ्यांना एकुण महागाई भत्ता हा 38 टक्के होणार आहे .
सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे –
सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणेबाबत राज्य कर्मचाऱ्यांमध्ये दोन मतप्रवाह आहेत , काहींच्या मते सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षे कायम ठेवावे असे आहेत , तर अनेकांचे मते सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्यात यावा असा आहे . यावर उचित असा निर्णय राज्य शासनाकडुन घेतला जाण्याची शक्यता आहे . कारण केंद्र सरकारसह इतर राज्यांनी सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे केले आहेत .
- राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव 4 टक्के महागाई भत्ता लागू करणेबाबत, राज्य सरकारकडून बैठक आयोजित !
- आनंदाची बातमी ! सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तामध्ये 4 टक्क्यांची वाढ , आता मिळणार 42 % दराने DA !
- शासन घेत आहे मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी! अनुदानाच्या माध्यमातून शिक्षणासाठी मुलींना मिळत आहेत 1 लाख 43 हजार रुपये !
- या महिलांना प्रति महिना देणार शासन एक हजार रुपये ! तुम्ही किंवा तुमच्या घरातील महिला व्यक्ती पात्र आहेत का? बघा व अर्ज करा !
- संपामध्ये सहभागी कर्मचाऱ्यांचे सेवेमध्ये खंड करणेबाबत सेवा पुस्तकातमध्ये नोंद !