राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये 4 टक्के वाढ करणेबाबत वित्त विभागाकडुन प्रस्ताव तयार !

Spread the love

राज्यातील शासकीय , जिल्हा परीषद व इतर पात्र कर्मचारी त्याचबरोबर राज्यातील निवृत्तीवेतनधारक कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर 4 टक्के महागाई भत्ता लागु करणेबाबत राज्य शासनाकडुन सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे . राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव चार टक्के डी.ए लागु करणेबाबत वित्त विभागाडुन प्रस्ताव राज्य सरकारला सादर करण्यात येणार आहे .

राज्य शासनाने पुढील महिन्यापासुन नागपुर येथे हिवाळी अधिवेशन कामकाज सुरु होणार आहे , मिडीया रिपोर्टनुसार या अधिवेशनामध्ये कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा होण्याची शक्यता आहे . यामध्ये प्रामुख्याने राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर 4% DA वाढ लागु करणेबाबत महत्वपुर्ण निर्णय घेतला जाणार असल्याची मोठी बातमी समोर आली आहे .यामध्ये वाढीव चार टक्के महागाई भत्ता हा माहे जुलै 2022 पासून थकबाकीसह लागू करण्याची तरतुद वित्त विभागाडुन करण्यात येणार आहे .यासाठी राज्याच्या वित्त विभागाडुन वाढीव महागाई भत्ता बाबतचा प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे .

सदरचा प्रस्तावावर हिवाळी अधिवेशनामध्ये सादर करण्यात येणार असून , सदर प्रस्तावावर चर्चा होवून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल .सदरच्या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात / पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार आहे .शिवाय माहे जुलै 2022 पासूनची महागाई भत्ता थकबाकी देखिल कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष रोखीने अदा करण्यात येणार असल्याने , कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे

Leave a Comment