Breaking News : राज्य शासकीय / निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी !

Spread the love

राज्य शासन सेवेत कार्यरत सर्व शासकीय / निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची मोठी बातमी समोर येत आहे . ती म्हणजे राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटना व आखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघ यांच्या आदेशानुसार शिक्षक भारती संघटनांकडुन जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबत बेमुदत संपाची तयारी करणेबाबत महत्वपुर्ण पत्रक निर्गमित झालेला आहे . या संदर्भातील शिक्षक भारती संघटनेचे सविस्तर प्रसिद्धीपत्रक पुढीलप्रमाणे पाहुयात .

राज्य सरकारी कर्मचारी संघटना , शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना समन्वय समितीने जुनी पेन्शन योजना लागु करा या प्रमुख मागणीसाठी राज्यव्यापी बेमूदत संप करण्याचा निर्णय घेतला आहे , शिक्षक भारती संघटना समन्वय समितीचा घटक आहे .राज्यातील सरकारी / निमसरकारी कर्मचारी , शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी संघटना सातत्याने संघर्ष करीत असून कर्मचाऱ्यांनी लढ्यात महत्वाची महत्वाची भुमिका बजावली आहे .या संघटना मार्फत दि.21.09.2022 रोजी राज्यात जुनी पेन्शन योजना लागू करा या एकाच मागणीसाठी तीव्र लक्षवेधी आंदोलन झाले .

राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या निर्णयानुसार दि.21 ते 25 नोव्हेंबर 2022 या कालावधीत जुनी पेन्शन योजना लागू करा या एका मागणीसाठी बेमुदत संपाची मानसिक तयारी करण्याची मोहिम हाती घेतली आहे .दि.21 ते 25 दरम्यान शिक्षक भारतीच्या सर्व पदाधिकारी यांनी शाळांना भेटी देवून बेमुदत संपाची तयारी कराण्याचे आदेश दिले आहेत .समन्वय समितीने संपाची तारीख निश्चित केल्यानंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये मागणी पुर्ण झाल्याशिवाय संप मागे घ्यायचा नाही असा निर्धार संघटनेमार्फत केला आहे .

शिक्षक भारती संघटनेचे संपासंदर्भातील सविस्तर प्रसिद्धीपत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता .

कर्मचारी विषयक , भरती / योजना व ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा .


Leave a Comment