केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य शासनाने महागाई भत्तामध्ये केली वाढ  ! GR निर्गमित दि.21.11.2022

Spread the love

केंद्र सरकारने सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तामध्ये 9 टक्के वाढ माहे जुलै 2022 पासुन लागु करण्यात आलेली आहे .त्याचधर्तीवर राज्यातील कर्मचाऱ्यांना महागाई भत्ताचा वाढ मिळावा याकरीता विधी व न्याय विभागाचा दि.21.11.2022 रोजी एक महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे . राज्यातील कोणत्या कर्मचाऱ्यांना या वाढीव महागाई भत्ताचा लाभ मिळणार आहे . याबाबतचा विधी व न्याय विभागाचा सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात .

केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या कार्यालयीन ज्ञापनानुसार दि.01.07.2022 पासुन लागु करण्यात आलेली 9 टक्के महागाई भत्त्यातील वाढ व ज्ञापनात नमुद इतर तरतुदी महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायालयातील दि.01 जानेवारी 2016 पुर्वी सेवानिवृतत न्यायिक अधिकाऱ्यांना लागु करण्यात आला आहे . सदर निर्णयानुसार आता महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायालयातील दि.01 जानेवारी 2016 पुर्वी सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना दि.01 .07 .2022 पासून 212% दराने महागाई भत्ता अनुज्ञेय असणार आहे . सदर महागाई भत्ता वाढीची रक्कम रोखीने अदा करण्याचे आदेश राज्य शासनाकडुन देण्यात आलेले आहेत .

त्याचबरोबर सदर वाढीव 9% डी.ए दि.01.07.2022 पासुन लागु करण्यात आला असल्याने जुलै पासूनची डी.ए थकबाकी रक्कम देखिल अदा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत . या संदर्भातील डी.ए वाढीबाबतचा विधी व न्याय विभागाचा दि.21.11.2022 रोजीचा सविस्तर शासन निर्णय ( शासन निर्णय सांकेतांक क्रमांक – 202211211725221512 ) डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा .

शासन निर्णय

कर्मचारी विषयक , भरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेटसाठी Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा

Leave a Comment