GR : निवृत्तीवेतनामध्ये 10,000/- रुपये वाढ करणेबाबत शासन निर्णय निर्गमित ! दि.22.11.2022

Spread the love

राज्य शासन स्वातंत्र्य सैनिक निवृत्तीवेतनधारक स्वातंत्र्य सैनिक / त्यांचे जोडीदार यांच्या स्वातंत्र्य सैनिक / त्यांचे जोडीदार यांच्या स्वातंत्र्य सैनिक निवृत्तीवेतनात वाढ करणेबाबत सामान्य प्रशासन विभागाचा अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . या संदर्भातील सामान्य प्रशासन विभागाचा दि.22.11.2022 रोजीचा सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात .

राज्य शासनामार्फत स्वातंत्र्य सैनिक / त्यांचे जोडीदार यांना सध्या देण्यात येत असलेल्या दरमहा 10,000/- इतक्या स्वातंत्र्य सैनिक निवृत्तीवेतनामध्ये 10,000/- ची वाढ करुन त्यांना दरमहा 20,000/- इतके निवृत्तीवेतन देण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे . ही वाढ दि.01 नोव्हेंबर 2022 पासून लागू असणार आहे .त्याचबरोबर राज्यातील केंद्र शासन स्वातंत्र्य सैनिकांना राज्य शासनाच्या दराप्रमाणे निवृत्तीवेतन देय असणार आहे . यासाठी राज्यातील केंद्र शासन स्वातंत्र्य सैनिकांना वाढीव निवृत्तीवेतन अनुज्ञेय असणार आहे .

यासाठी होणारा खर्च सामाजिक सुरक्षा योजनेखालील निवृत्तीवेतन , निवृत्तीवेतनविषयक खर्च या लेखाशिर्षाखालील मंजुर निधीतुन भागविण्यात यावा असे निर्देश देण्यात आले आहेत .या संदर्भातील निवृत्तीवेतनामध्ये वाढ करणेबाबतचा सविस्तर शासन निर्णय ( शासन संकेतांक क्रमांक – 202211221659335207 ) डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा .

शासन निर्णय

कर्मचारी विषयक , शासकीय भरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेटसाठी जॉईन करा खालील Whatsapp  ग्रुप .

Leave a Comment