राज्यातील कर्मचाऱ्यांना अखेर महागाई भत्ता वाढीबाबतचा शासन निर्णय निर्गमित ! शासन निर्णय दि.23.11.2022

Spread the love

राज्यातील पाचव्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणीत निवृत्तीवेतन / कुटुंबनिवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांना दि.01 जुलै 2022 ते 01 जानेवारी 2022 या कालावधीतील महागाई भत्ता वाढ देणेबाबतचा वित्त विभागाचा अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय दि.23.11.2022  रोजी निर्गमित झालेला आहे . या संदर्भातील वित्त विभागाचा दि.23.11.2022 रोजीचा सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात .

राज्य शासन सेवेतील जे निवृत्तीवेतनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक अद्याप असुधारित वेतनश्रेणीत निवृततीवेतन घेत आहेत . त्यांच्या मूळ निवृत्तीवेतन / कुटुंबनिवृत्तीवेन रक्कमेवर अनुज्ञेय महागाई वाढीचा दर सुधारित करण्यात आलेला आहे . यामध्ये जुलै 2018 पासुन 284 टक्के महागाई भत्ता होता . यामध्ये जानेवारी 2019 ला वाढ करुन 295 टक्के तर 01 जुलै 2019 ला 312 टक्के करण्यात आला . तसेच 01 जानेवारी 2021 पासुन 356 टक्के महागाई भत्ता दर करण्यात आला असून 1 जुलै  2021 पासुन 368 टक्के करण्यात आला आहे .त्याचबरोबर 01 जानेवारी 2022 पासुन 381 टक्के महागाई भत्ता करण्यात आला आहे .

सदर शासन निर्णय राज्यातील ज्यांना निवृत्तीवेतन योजना लागु आहे अशा मान्यता व अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्था , कृषी / कृषीतर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालये यांमधील निवृत्तीवेतनधारक / कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांना वरील निर्णय योग्य त्या फेरफारास लागू असणार आहेत .त्याचबरोबर जिल्हा परिषदांचे निवृत्तीवेतनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक यांनाही लागु असणार आहेत . या संदर्भातील वित्त विभागाचा दि.23.11.2022 रोजीचा सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी ( शासन निर्णय संकेतांक क्रमांक – 202211231507256905 ) पुढील लिंकवर क्लिक करा .

शासन निर्णय

Leave a Comment