सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर : पगार संदर्भात राज्य शासनाकडुन महत्वपुर्ण आदेश निर्गमित दि.22.11.2022

Spread the love

राज्यातील जिल्हा परिषदा , महानगरपालिका , नगरपरिषदा / कटक मंडळे त्याचबरोबर खाजगी प्राथमिक शाळेतील शिक्षकांचे व सेवानिवृत्त शिक्षकांचे माहे ऑक्टोंबर 2022 व माहे नोव्हेंबर 2022 च्या अनुदान वितरणबाबत अत्यंत महत्वपुर्ण आदेश राज्य शासनाच्या प्राथमिक शिक्षण संचालनालय यांच्याकडुन निर्गमित झालेला आहे . प्राथमिक शिक्षण संचालनालय यांचे दि.21.11.2022 रोजीचे सविस्तर पत्र पुढीलप्रमाणे पाहुयात .

सन 2022-23 या आर्थिक वर्षातील माहे सप्टेंबर 2022 पर्यंतचे महिन्याचे शिक्षकांचे वेतन अदा करणेसाठी लेखाशिर्ष अंतर्गत मुळ मंजुर तरतुदीच्या 75 % तरतुद संचालनालयस्तरावरुन चौदा हजार सहाशे नव्वद कोटी तेरा लाख एकसष्ट हजार फक्त एवढी रक्कम वितरीत करण्यात आली आहे .त्याचबरोबर सेवानिवृत्त शिक्षकांचे लेखाशिर्ष अंतर्गत 70 टक्के तरतुद संचालनालय स्तरावरुन चार हजार सातशे पंच्याहत्तर कोटी साठ लाख शेहचाळीस हजार फक्त इतका निधी वितरीत करण्यात आला आहे .त्याचबरोबर राज्यातील जिल्हा परिषदेतील काही तालुक्यातील शिक्षकांचे माहे ऑक्टोंबर 2022 चे वेतन व सेवा निवृत्तीवेतन अद्यापर्यंत झालेले नाहीत .

अशा कर्मचाऱ्यांचे वेतन / निवृत्तीवेतन अदा करण्यासाठी निधींचे वितरण लेखाशिर्ष अंतर्गत वितरीत करण्यात आलेली आहे . कर्मचाऱ्यांचे माहे ऑक्टोंबर महीन्यांचे वेतन / निवृत्तीवेतन प्रथम प्राधान्याने वितरीत करुन शिल्लक निधीमधून माहे नोव्हेंबर महिन्याचे वेतन / निवृत्तीवेतन अदा करण्यात यावे असा आदेश देण्यात आला आहे . वेतन / निवृत्तीवेतन संदर्भातील प्राथमिक संचालनालय यांचे दि.21.11.2022 रोजीचे सविस्तर आदेश पुढीलप्रमाणे पाहु शकता .

Leave a Comment