राज्यातील सर्व शासकीय , जिल्हा परिषदा व इतर पात्र कर्मचारी त्याचबरोबर पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर देय 38 टक्के महागाई भत्ता बाबत अखेर राज्य शासनाकडुन मुहुर्त ठरला आहे .केंद्र सरकारने जुलै 2022 पासून लागु केलेला वाढीव 4 टक्के डी.ए च्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता लागु करण्यात येणार आहे .
राज्य शासन सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांना सध्या 34 टक्के डी.ए माहे जानेवारी 2022 पासून लागू करण्यात आलेला आहे .केंद्र सरकारने माहे जुलै 2022 पासून AICPI च्या निर्देशांकानुसार आणखीण 4 टक्के डी.ए वाढ लागु करण्यात आली आहे . याच धर्तीवर राज्यातील सर्व शासकीय , जिल्हा परिषद व इतर पात्र असणारे कर्मचारी त्याचबरोबर निवृत्तीवेतनधारक कर्मचाऱ्यांना माहे जूलै 2022 पासुन 4 टक्के डी.ए वाढ थकबाकीसह अनुज्ञेय करण्यात येणार आहे .राज्यातील आखिल भारतीय सेवेतील कर्मचाऱ्यांना त्याचबरोबर पाचव्या व सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या पेन्शनधारकांना डी.ए वाढ लागु करण्यात आलेली आहे .
हिवाळी अधिवेशनामध्ये होणार मोठा निर्णय –
राज्य शासनाचे हिवाळी अधिवेशन पुढील महिन्याच्या 19 तारखेपासून सुरु होणार असून या अधिवेशनामध्ये कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता अनुज्ञेय करणेबाबतचा मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे .या अधिवेशनामध्ये वाढीव डी.ए बाबतचा अधिकृत्त शासन निर्णय निर्गमित करण्यात येईल . वाढीव महागाई भत्ता बाबतचा प्रस्ताव वित्त विभागाकडुन तयार करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे . यामुळे लवकरच राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव चार टक्के डी.ए चा लाभ मिळणार आहे .
- राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव 4 टक्के महागाई भत्ता लागू करणेबाबत, राज्य सरकारकडून बैठक आयोजित !
- आनंदाची बातमी ! सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तामध्ये 4 टक्क्यांची वाढ , आता मिळणार 42 % दराने DA !
- शासन घेत आहे मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी! अनुदानाच्या माध्यमातून शिक्षणासाठी मुलींना मिळत आहेत 1 लाख 43 हजार रुपये !
- या महिलांना प्रति महिना देणार शासन एक हजार रुपये ! तुम्ही किंवा तुमच्या घरातील महिला व्यक्ती पात्र आहेत का? बघा व अर्ज करा !
- संपामध्ये सहभागी कर्मचाऱ्यांचे सेवेमध्ये खंड करणेबाबत सेवा पुस्तकातमध्ये नोंद !