राज्य शासनाने राज्यातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी खुशखबर दिली आहे , ती म्हणजे 80 वर्ष व त्यावरील दुय्यम न्यायालयातील सेवानिवृत्त न्यायिक अधिकारी निवृत्तीवेतनधारक / कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना अतिरिक्त निवृत्तीवेतन तसेच कुटुंब निवृत्तीवेतनात वाढ देणेबाबत विधी व न्याय विभागाकडुन अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय दि.24.11.202 रोजी निर्गमित झालेला आहे .
विधी व न्याय विभागाच्या या शासन निर्णयान्वये , सेवानिवृत्त न्यायाधिश / कुटुंब निवृत्तीवेतन धारकांना 80/85/90/95/100 वर्ष वय सुरु झाल्याच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच 79/84/89/94/99 वर्ष वय पुर्ण झाल्यानंतर लगेचच 20 टक्के , 30 टक्के , 40 टक्के , 50 टक्के , 100 टक्के अतिरिक्त निवृत्ती वेतनाचे फायदे लागु करण्यात आले आहेत . यामध्ये निवृत्तीवेनधारकांच्या वयाच्या 80 वर्ष ते 84 वर्षे पुर्ण होईपर्यंत मुळ निवृत्ती वेतन / कुटुंब निवृत्तीवेतनाच्या 20 टक्के अतिरिक्त निवृत्ती वेतन वाढ करण्यात आलेली आहे .तसेच 85 ते 89 वयोवर्ष असणाऱ्या निवृत्तीवेतनधारकांना त्यांच्या मुळ वेतनाच्या 30 टक्के तर 90 ते 94 वयोवर्ष असणाऱ्या निवृत्तीवेतनधारकांना मुळ निवृत्तीवेतनाच्या 30 वाढ करण्यात आलेली आहे .
त्याचबरोबर 90 ते 94 वर्ष असणाऱ्या निवृत्तीवेतनधारकांना 40 टक्के तर 95 ते 94 वयोवर्ष असणाऱ्या निवृत्तीवेतनधारकांना 50 टक्के वाढ लागु करण्यात आली आहे .तर ज्या निवृत्तीवेतनधारकांचे 100 वर्ष सुरु झाल्याच्या पहिल्या दिवसापासून ते त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या निवृत्तीवेनधारकांना सुधारित मूळ निवृत्तीवेतन / कुटुंब निवृत्ती वेतनाच्या 100 टक्के अतिरिक्त निवृत्तीवेतन वाढ करण्यास राज्य शासनाकडुन मान्यता देण्यात आलेली आहे .या संदर्भाती विधी व न्याय विभागाचा दि.24.11.2022 रोजीचा सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी ( शासन निर्णय संकेतांक क्रमांक – 202211241127383412 ) पुढील लिंकवर क्लिक करा .
- राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव 4 टक्के महागाई भत्ता लागू करणेबाबत, राज्य सरकारकडून बैठक आयोजित !
- आनंदाची बातमी ! सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तामध्ये 4 टक्क्यांची वाढ , आता मिळणार 42 % दराने DA !
- शासन घेत आहे मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी! अनुदानाच्या माध्यमातून शिक्षणासाठी मुलींना मिळत आहेत 1 लाख 43 हजार रुपये !
- या महिलांना प्रति महिना देणार शासन एक हजार रुपये ! तुम्ही किंवा तुमच्या घरातील महिला व्यक्ती पात्र आहेत का? बघा व अर्ज करा !
- संपामध्ये सहभागी कर्मचाऱ्यांचे सेवेमध्ये खंड करणेबाबत सेवा पुस्तकातमध्ये नोंद !