सन 2023 मध्ये सरकारी कर्मचारी होणार मालामाल ! वाढीव DA सह मुळ वेतनामध्ये मिळणार इतकी वाढ .

Spread the love

सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातुन दोन वेळेस डी.ए वाढ लाभ अनुज्ञेय करण्यात येत असतो , यामध्ये माहे जानेवारी व जुलै असे दोनदा महागाई भत्तामध्ये वाढ करण्यात येते . केंद्र सरकारने माहे जुलै 2022 पासुन केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तामध्ये 4 टक्के वाढ केल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा एकुण महागाई भत्ता हा 38 टक्के झाला आहे .आता सन 2023 माहे जानेवारी महिन्यामध्ये परत कर्मचाऱ्यांच्या डी.ए मध्ये वाढ होणार आहे .

ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाचा विचार केला असता , माहे जानेवारी 2023 मध्ये परत कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये 4 टक्के / 5 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे .यामुळे एकुण महागाई भत्ता हा 43 टक्के होईल .परत माहे जुलै 2023 मध्ये आणखीण 5 टक्के डी.ए वाढ लागु केल्यास निश्चितच कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 48 टक्केला जावून पोहचणार आहे .म्हणजेच कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ताचा दर कमाल उच्चांक गाठणार आहे . केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार , सातव्या वेतन आयोगामध्ये महागाई भत्ता हा 50 टक्केपेक्षा अधिक झाल्यास मुळ वेतन वाढ होणे अपेक्षित आहे .

किमान मुळ वेतनामध्ये होणार वाढ –

कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता 50 टक्के पेक्षा अधिक झाल्यास परत महागाई भत्ताचे दर शुन्‍य होईल व कर्मचाऱ्यांना मुळ वेतनामध्ये सुधारणा करण्यात येईल .3.68 पट फिटमेंट फॅक्टर वाढ प्रमाणे विचार केला असता , केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान मुळ वेतन 18,000/- वरुन 26,000/- रुपये होणार आहे तर ज्या राज्यांचे सातव्या वेतन आयोगानुसार किमान मुळ वेतन 15,000/- रुपये आहे अशा कर्मचाऱ्यांचे किमान मुळ वेतन 21,000/- होणार आहे .यामुळे कर्मचाऱ्यांच्या एकुण वेतनामध्ये मोठी वाढ होणार आहे .

Leave a Comment