अखेर सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आली मोठी आनंदाची बातमी ! थकबाकीची दोन लाख रुपये पर्यंतची रक्कम होणार जमा .

Spread the love

सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत कोराना महामारी कालावधी मधील महागाई भत्ता अद्याप पर्यंत अदा करण्यात आलेला नाही .या कोराना कालावधी मधील 18 महीने कालावधीमधील महागाई भत्ता थकबाकी बाबत केंद्र सरकारकडुन लवकरच मोठा सकारात्मक निर्णय घेण्यात येणार आहे . ज्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये थकबाकीची रक्कम लवकरात लवकर जमा करण्यात येणार आहे .

या 18 महिने कालावधी मधील महागाई भत्ता अदा करणेबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये अनेक खटले प्रलंबित आहेत . यापैकी या 18 महिने कालावधी मध्ये सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिलेला आहे .या 18 महिने कालावधीमध्ये सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या कालावधीनुसार वाढीवा महागाई भत्ता अदा करणेबाबत महत्वपुर्ण निर्णय न्यायालयाने दिलेला आहे . परंतु या निकालावर केंद्र सरकारने अद्याप पर्यंत अंमलबजावणी केली नाही . यामुळे या विषयावर केंद्र शासनाची लवकरच बैठक आयोजित करण्यात येणार आहे .

या निर्णयावर केंद्र सरकारने सकारात्मक निर्णय घेतल्यास , सरकारी कर्मचारी त्याचबरोबर पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना या 18 महिने कालावधीमधील महागाई भत्ता थकबाकीचा लाभ अनुज्ञेय करण्यात येणार आहे . या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणीनुसार 50,000/- रुपये ते 2 लाख रुपये पर्यंत थकबाकीची रक्कम मिळणार आहे .

वन टाईम सेटलमेंट होण्याची शक्यता –

 या 18 महिने कालावधी मधील डी.ए थकबाकी अदा करण्या ऐवजी एकदाच वन टाईम सेटलमेंट होण्याची शक्यता आहे . म्हणजेच थकबाकी न देता महागाई भत्ता मध्ये एकदाच वाढ 4 टक्के / 5 टक्के वाढ अनुज्ञेय करण्यात येईल . सदरचा लाभ केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागु झाल्यास , राज्यातील सरकारी कर्मचारी तसेच निवृत्तीवेतनधारक कर्मचाऱ्यांना देखिल लाभ अनुज्ञेय करण्यात येणार आहे .


Leave a Comment