कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! पेन्शन नियमामध्ये मोठा बदल , कर्मचाऱ्यांना मिळणार मोठे फायदे !

Spread the love

कर्मचाऱ्यांच्या पेन्शनसंदर्भात आत्ताची मोठी आनंदाची अपडेट समोर आलेली आहे . ती म्हणजे कर्मचाऱ्यांच्या पेन्शन योजनेची वेतन मर्यादा सरकारकडुन वाढ करण्यात येणार आहे .हे नियम लागु होणार असल्याने कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे .पेन्शन नियमामध्ये नेमका कोणता बदल करण्यात येणार आहे , या संदर्भातील सविस्तर बातमी पुढीलप्रमाणे पाहुयात .

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजनेतील सेवानिवृत्ती बचत योजना करीता वेतनाची मर्यादा ही वाढवून 15,000/- रुपये वरुन 21,000/- अशी करण्यात आलेली आहे .सन 2014 मध्ये भविष्य निर्वा निधी योजनेत 6,500/- रुपये प्रति महीना वरुन भविष्य निर्वाह निधी योजनेतील योगदानात वाढ करण्यात आलेली होती .सध्याच्या महागाईचा विचार केला असता , रुपये 15000/- रुपये मासिक वेतन 12 टक्के 1,800/- रुपये आहे जर वेतनाची मर्यादा ही वाढवून 21,000/- रुपये केले असल्यास पीएफ योगदानामध्ये वाढ होवून 2520 रुपये होणार आहे .

सध्याच्या घडीला कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजनेचा लाभ देशामध्ये सुमारे 75 लाख कर्मचारी घेत आहेत .शिवाय जमा रक्कमेवर व्याजदर मध्ये देखिल वाढ करण्यात येणार आहे .या निर्णयामुळै EPFO धारक कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती नंतर पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार आहे .

Leave a Comment