8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर , नव्या वेतन आयोगानुसार पगारात होणार 44 टक्क्यांनी वाढ ! जाणून घ्या लेटेस्ट अपडेट .

Spread the love

सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत लवकरच मोठी आनंदाची दिलासादायक बातमी समोर येत आहे . ती म्हणजे नव्या वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांच्या पगरामध्ये तब्बल 44 टक्क्यांची वाढ होणार आहे .सध्या देशामध्ये कर्मचाऱ्यांना 7 th Pay Commission प्रमाणे वेतन मिळत आहे ,लवकरच कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागु होण्याची चिन्हे दिसत आहेत .नवा वेतन आयोग संदर्भातील आत्ताची लेटेस्ट अपडेट पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .

सातवा वेतन आयोगानुसार अनेक कर्मचाऱ्यांना कमी पगार मिळत असल्याची तक्रार कर्मचाऱ्यांकडुन होताना दिसत आहेत . शिवाय महागाई भत्ताचे दर देखिल लवकरच 50 टक्केपेक्षा अधिक होणार आहे . म्हणजेच डी.ए चे दर 50 टक्के पेक्षा अधिक झाल्यास , कर्मचाऱ्यांना नवा वेतन आयोगानुसार वेतन अदा करणे अपेक्षित आहेत .सध्याच्या सातवा वेतन आयोगानुसार केंद्र व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 2.57 पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे पगार मिळत आहे , या नवा वेतन आयोगानुसार या फॅक्टरमध्ये 3.68 पट वाढ करण्यात येणार आहेत .यामुळे पगारामध्ये चक्क 44 टक्के वाढ होणार आहे .

किमान वेतनात होणार 8,000/- रुपये वाढ –

सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन हे फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून असतात , जर या फॅक्टर मध्ये 3.68 पट वाढ लागु केल्यास केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या किमान मुळ वेतनामध्ये 8,000/- रुपयांची वाढ होणार आहे . म्हणजेच किमान बेसिक हे 18,000/- वरुन 26,000/- रुपये पर्यंत वाढ होईल .तर राज्य कर्मचाऱ्यांचा विचार केला असता , किमान बेसिक हे 15,000/- रुपये वरुन 21,000/- पर्यंत वाढ होईल .

महागाई भत्ता होणार शुन्य टक्के –

नवा वेतन आयोग लागु झाल्यास सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार डी.ए हा परत शुन्य टक्के होईल .त्यानंतर ग्राहक निर्देशांकाच्या आधारे डी.ए मध्ये वाढ करण्यात येईल .परंतु HRA मध्ये निश्चितच मोठी वाढ होईल .

आठवा वेतन आयोग  / स्वयंचलित वेतन प्रणालीनुसार वेतनवाढ – सरकारी कर्मचाऱ्यांना नवा वेतन आयोग लागु करावा कि सातवा वेतन आयोगामध्येच स्वयंचलित वेतन प्रणालीद्वारे पगारवाढ करावी याबाबत केंद्र सरकारकडुन चर्चा सुरु आहे .स्वयंचलित वेतनवाढ प्रणालीनुसार कर्मचाऱ्यांचा डी.ए 50 टक्के पेक्षा अधिक झाल्यास , स्वयंचलित वेतन पद्धतीने वेतनात वाढ करण्यात येईल .


Leave a Comment