GR : राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन संरचना लागु करणेबाबत महत्वपुर्ण शासन अधिसुचना ( सुधारणा )  निर्गमित ! दि.28.11.2022

Spread the love

राज्य शासन सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन तरतुदीनुसार सुधारित वेतनसंरचना लागु करणेबाबत राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत अत्यंत महत्वपुर्ण शासन अधिसुचना ( सुधारणा ) दि.28 नोव्हेंबर 2022 रोजी निर्गमित करण्यात आली आहे . सुधारित वेतन संरचना संदर्भातील सुधारित अधिसूचना पुढीलप्रमाणे पाहुयात .

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 मधील कलम 8 येथील तरतुदी अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन महाराष्ट्र शासन अधिसूचना क्र.वेतन दि.08.12.2020 अन्वये निर्गमित करण्यात आलेल्या महाराष्ट्र अकृषी विद्यापीठे प्रमाणसंहिता यामध्ये शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे सुधारित वेतन नियम 2020 मध्ये सुधारणा करण्यात आली आहे . यामध्ये वेतनसंरचना 4300 ऐवजी 4400 अशी सुधारणा करण्यात आली आहे . यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाद या शीर्षकाखालील वेतन धारण कर्मचाऱ्यांना मोठा फायदा मिळणार आहे .

त्याचबरोबर राज्यातील इतर विभागांमध्ये कार्यरत असणाऱ्या ज्या कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये त्रुटी आढळुन आलेल्या आहेत . अशा कर्मचाऱ्यांना देखिल सुधारित वेतनसंरचना लागु करणे प्रस्तावित आहेत . या संदर्भातील उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडुन निर्गमित झालेली शासन अधिसुचना पुढीलप्रमाणे पाहु शकता .

Leave a Comment