महाराष्ट्र राज्य शासनाची दि.29.11.2022 रोजी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षेतेखाली मंत्रीमंडळ बैठक संपन्न झाली . या बैठकीमध्ये विविध निर्णय घेण्यात आलेले आहेत . या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये राज्यातील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अनेक महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत .कर्मचाऱ्यांच्या बाबतीत घेण्यात आलेले महत्वपुर्ण निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात .
महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील पात्र शासकीय कर्मचाऱ्यांना सन 2006 ते 2008 या वर्षातील अत्युत्कृष्ट कामासाठीचा आगाऊ वेतनवाढीचा लाभ देण्याचा अत्यंत महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आला आहे . त्याचबरोबर 6 व्या वेतन आयोगाचा कालावधी 1 डिसेंबर 2015 रोजी संपल्यानंतर आगाऊ वेतनावाढीचा लाभ न देण्याचा निर्णय ऑगस्ट 2017 मध्ये घेतला होता , यापैकी ज्या कर्मचाऱ्यांना 5 व्या वेतन आयोागानुसार ऑक्टोबर 2006 , ऑक्टोंबर 2008 साठीचे आगाऊ वेतनवाढीचे लाभ देण्यात आले होते . त्या लाभाची रक्कमेची वसूली केली गेली .आता वसूली केलेली आगाऊ वेतन वाढीची रक्कम संबंधितांना ठोक स्वरुपात परत देण्यात येणार आहेत .
आगाऊ वेतनवाढी मंजूर झालेल्या आहेत मात्र सन 2017 च्या शासन निर्णयानुसार प्रत्यक्ष लाभ देण्यात आलेले नाहीत त्यांना देखिल ही लागू असणारी रक्कम ठोक स्वरुपात देण्याचा मोठा निर्णय राज्य शासनाकडुन घेण्यात आलेला आहे .
त्याचबरोबर महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन थकबाकी देणेबाबत योग्य तो निर्णय घेण्या संदर्भात मंत्रिमंडळाची उपसमिती नेमण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे . या उपसमितीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार , अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांचा समावेश करण्यात आला आहे .
- राज्यातील कार्यरत / सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.01.02.2023
- Top Highlights : 2022-23 बजेटमधील टॉप महत्वाच्या घोषणा !
- Ration Card Big Update : रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी! आता गहू तांदळा सोबत मिळतील 5 हजार रुपये !
- Shivsena President : शिवसेना नक्की कोणाची? शिवसेना पक्षाच्या अध्यक्षस्थानी कोण असेल ठाकरे की शिंदे: जाणून घ्या सविस्तर !
- Business Idea : व्यवसायाची भन्नाट संकल्पना! तुमच्या गावामध्ये किंवा शहरामध्ये सुरू करा हा व्यवसाय होईल लाखोंची कमाई !