राज्यातील या कर्मचाऱ्यांसाठी मोठी धक्कादायक बातमी , होणार मोठी कार्यवाही ! प्रशासनाकडुन आदेश निर्गमित .

Spread the love

राज्यातील बोगस प्रमाणपत्रधारण करुन शासन सेवेत बदली प्रक्रीया करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आता मोठी कार्यवाही होणार आहे . राज्य शासन सेवेत जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांसह शिक्षकांच्या वैद्यकीय प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याबाबत राज्य शासनाकडुन आदेश देण्यात आलेले आहेत .बोगस प्रमाणपत्र संदर्भाती सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे पाहुयात .

नाशिक जिल्ह्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयातुन आंतरजिल्हा बदलीकरीता कर्मचाऱ्यांकडुन बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र मिळविल्याच्या घटना नेहमीच घडत असताना दिसत असल्याने , नाशिक जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिया मित्तल यांनी वैद्यकीय प्रमाणपत्र पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत .या घटनेची दखल राज्य शासनाकडुन घेवून विभाग बदलीकरीता बोगस प्रमाणपत्र धारण करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आता कार्यवाही होणार असल्याची बातमी समोर येत आहे .

जिल्हा परिषदेमधील बहुतांश कर्मचाऱ्यांनी विभागीय बदलीकरीता बोगस प्रमाणपत्र केल्याची घटना उघड झाली असल्याने या घटनेशी संबंधित असणाऱ्या आरोग्य विभागामधील कर्मचाऱ्यांवर देखिल कार्यवाही होण्याची शक्यता आहे .सदर प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याचे आदेश दिल्याने या घटनेशी संबंधित कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत .

Leave a Comment