7 th Pay Commission : राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता 34 % वरुन 38 % !

Spread the love

राज्य शासन सेवेत कार्यरत शासकीय , जिल्हा परिषदा त्याचबरोबर इतर पात्र कर्मचारी तसेच निवृत्तीवेतनधारक कर्मचाऱ्यांचा डी.ए 34 टक्के वरुन 38 टक्के वाढ करणेबाबत आत्ताची मोठी आनंदाची अपडेट समोर आलेली आहे . राज्य शासनाची नुकतेच मंत्रीमंडळ बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये डी.ए वाढीबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही .

4 % महागाई भत्ता वाढ प्रस्ताव –

वित्त विभागाकडुन राज्य शासनाचा महागाई भत्ता हा केंद्र सरकारच्या धर्तीवर जुलै 2022 पासुन वाढ करणेबाबत प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे . या प्रस्तावावर राज्य शासनाकडुन हिवाळी अधिवेशांमध्ये निर्णय घेण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे .कारण राज्य कर्मचारी हिवाळी अधिवेशाच्या वेळी संप करण्याच्या तयारीत असल्याने , या काळामध्ये डी.ए वाढ केल्यास कर्मचारी संपाची तिव्रता कमी होईल , असे बोलले जात आहे .कर्मचाऱ्यांकडुन जुनी पेन्शन या प्रमुख मागणीसाठी आंदोलन करण्यात येणार आहे .

जुलै 2022 पासुनच डी.ए थकबाकीसह , 4 टक्के महागाई भत्ता वाढ –

राज्यातील कर्मचाऱ्यांना माहे जुलै 2022 पासुनच 4 टक्के वाढीव महागाई भत्ता लागु होणार आहे . माहे डिसेंबर महिन्याचे वेतन / पेन्शन देयकासोबत वाढीव 4 टक्के महागाई भत्ता व जुलै ते नोव्हेंबर या कालावधीमधील महागाई भत्ता फरक राज्य कर्मचाऱ्यांना अदा करण्यात येणार आहे . यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना माहे डिसेंबर महिन्याच्या पगारासोबत मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे .राज्यातील निवृत्तीवेतनधारकांना देखिल त्वरित वाढीव डी.ए लागु करण्यात येणार आहे .

Leave a Comment