खुशखबर ! राज्य कर्मचाऱ्यांना सेवाविषय लाभ अनुज्ञेय करणेबाबत , राज्य शासनाचा मोठा निर्णय .

Spread the love

महाराष्ट्र राज्य शासनाची दि.29.11.2022 रोजी मंत्रिमंडळ बैठक संपन्न झाली असून , या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये विविध महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आले अहेत . कर्मचारी विषयक सातवा वेतन आयोग थकबाकी ,आगाऊ वेतनवाढ त्याचबरोबर सेवाविषयक लाभ अनुज्ञेय करणेबाबत मोठा महत्वपुर्ण निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे .

राज्य शासन सेवेतील अधिसंख्य पदावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेवाविषयक त्याचबरोबर सेवानिवृत्ती विषयक लाभ देण्याचा त्याचबरोबर मानवतावदी दृष्टहकोनातूर तांत्रिक खंड देवून पुन्हा 11 महिन्यांच्या कालावधीकरीता त्यांच्या सेवा सुरु ठेवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे . त्याचबरोबर अनुसूचित जमातीची रिक्त पदे भरण्याची कार्यवाही देखिल तात्काळ सुरु करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे 3,898 कर्मचारी अधिसंख्य पदाव वर्ग करण्यात आलेले आहेत .

या निर्णयामुळे अधिसंख्य पदावरील कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या शासनाच्या प्रचलित धोरण व नियमानुसार लाभ मिळणार आहे . परंतु या अधिसंख्य पदावरील अधिकारी / कर्मचाऱ्यांना पदोन्नती , वेतनवाढ मिळणार अनुकंपा धोरण लागू राहणार नाही .या निर्णयामुळे राज्यातील अधिसंख्य पदावरील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे .


Leave a Comment