Pension News : पेन्शनबाबत मोठी अपडेट ! बंद होणार जुनी (Old Pension) पेन्शन ? जाणुन घ्या सविस्तर अपडेट

Spread the love

देशभरामध्ये एकीकडे जुनी पेन्शन सुरु करण्यासाठी कर्मचाऱ्यांचे तिव्र आंदोलने होत असतानाच निती आयोगाकडुन एक खळबळजनक वृत्त समोर येत आहे .देशांमध्ये जे राज्य राष्ट्रीय  पेन्शन योजना रद्द करुन परत जुनी पेन्शन योजना लागु करत आहेत . अशा राज्य सरकारवर आता जुनी पेन्शनच्या मुद्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत .

जुनी पेन्शन बंद होणार ?

राजस्थान सरकारने जुनी पेन्शन योजना लागु केली आहे , यावर निती आयोगाच्या उपाध्यक्षा सुमन बेरी यांनी चिंता व्यक्त केल्याने जुनी पेन्शन योजना बंद होणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे .यावर राजस्थान राज्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी स्पष्ट केले कि , भाजप सरकार जुनी पेन्शन योजनेच्या विरोधात असल्याने , राजस्थान सरकारने जुनी पेन्शन योजना लागु केलेल्या निर्णयाशी सहमत नसुन याचा विरोध करत आहेत .

पेन्शनबाबत निती आयोगाचे काय म्हणणे आहे ?

निती आयोगाचे म्हणणे आहे कि , भारत देशाला वित्तीय व विवेक व विकासात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रीत करण्याची आवश्यक आहे .जुन्या पेन्शन योजनेमुळे सरकारला आर्थिक संकटांचा सामना करावा लागेल .परिणामी भारताला आर्थिक , विकासात्मक धोरण राबविण्यासाठी अडचणी निर्माण होतील .निती आयोगाच्या उपाध्यक्षा सुमन बेरी बोलताना सांगितले कि , जुनी पेन्शन योजना परत लागु करणे ही अधिक चिंतेचे बाब आहे , याचा अतिरिक्त भार शासनाच्या तिजोरिवर पडणार आहे.

निती आयोगाच्या उपाध्यक्षांच्या स्पष्टीकरणांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजगी पसरु लागली आहे . कारण लोकप्रतिनिधी यांना अद्याप पर्यंत जुन्या पेन्शन प्रमाणे पेन्शन लाभ मिळतो . परंतु कर्मचाऱ्यांना मात्र शेअर मार्केटवर आधारीत अत्यल्प पेन्शन मिळणारी राष्ट्रीय पेन्शन योजना लागु करण्यात आलेली आहे .

कर्मचारी विषयक , भरती / योजना व ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा


Leave a Comment