Old Pension : जुनी पेन्शनसाठी देशातील सर्व राज्यांमधील कर्मचाऱ्यांचे दिल्ली येथे संयुक्त राष्ट्रीय महाअधिवेशन !

Spread the love

ऑल इंडिया स्टेट गव्हर्नमेंट एम्प्लाईज फेडरेशन आणि सेंट्रल गव्हर्नमेंट फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यामाने देशातील सर्व राज्यांमध्ये कार्यरत राज्याचे कर्मचारी तसेच केंद्र सरकार अंतर्गत कार्यरत असणारे कर्मचाऱ्यांच्या भविष्याच्या हितासाठी दि.08 डिसेंबर 2022 रोजी दिल्ली येथे जुनी पेन्शन या प्रमुख मागणीसाठी संयुक्त राष्ट्रीय अधिवेशन आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहेत .

राज्यातील सर्व सरकारी – निमसरकारी कर्मचारी दि.21.11.2022 ते 25.11.2022 या कालावधीमध्ये NPS हटाव सप्ताह सर्वदुर महाराष्ट्र राज्यात पाळीत आहे .सर्वांना जुनी पेन्शन योजना लागु करुन NPS हटाव ही मागणी सर्वार्थाने पदरी पाडायची असेल तर PFRDA  कायदा रद्द होणे आवश्यक आहे .यासाठीच देशातील केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचारी दि.08 डिसेंबर रोजी तालकटोरा स्टेडियम , नवी दिल्ली येथे संयुक्त अधिवेशन घेवून पुढची तीव्र संघर्षाची वाटचाल निश्चित करणार आहेत .सदर अधिवेशनास सर्वच राज्यांतुन कर्मचारी उपस्थित राहणार आहेत .

महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना सदर अधिवेशानामध्ये सामिल होण्याचे आव्हान राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना , महाराष्ट्र तसेच जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष यांनी केले आहे .राष्ट्रीय पातळीवर जुनी पेन्शन या प्रमुख मागणीसाठी प्रथमच महाअधिवेशन होणार असल्याने सरकारच्या या मागणीवर योग्य निर्णय घ्यावा लागणार आहे .यासंदर्भातील संयुक्त राष्ट्रीय अधिवेशनाचे प्रसिद्धीपत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता .

कर्मचारी विषयक , भरती / योजना व ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा


Leave a Comment