शासन सेवेतील रोजंदारी / तासिक तत्वावरील कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित करणेबाबत शासन निर्णय निर्गमित ! GR दि.02.12.2022

Spread the love

राज्य शासन सेवेतील आदिवासी विकास विभागामधील आश्रमशाळा / वसतिगृहामधील रोजंदारी / तासिका तत्वावरील कर्मचाऱ्यांना राज्य शासन सेवेत नियमित करण्याबाबत महत्वपुर्ण दिलासादायक शासन निर्णय आदिवासी विकास विभागाकडुन दि.02 डिसेंबर 2022 रोजी निर्गमित करण्यात आला आहे . या संदर्भातील आदिवासी विकास विभागाचा दि.02.12.2022 रोजीचा सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात .

आदिवासी विकास विभागाच्या अधिनस्त विभागिय स्तरावर आयुक्त आदिवासी विकास नाशिक , ठाणे , नागपुर , अमरावती अशी एकुण चार विभागीय कार्यालये असून एकुण 30 प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालये कार्यर आहेत .आदिवासी विकास विभाग अंतर्गत एकुण 499 शासकीय आश्रमशाळा आहेत . आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत आदिवासी शासकीय आश्रमशाळा / वसतिगृहामध्ये दि.31.10.2018 रोजी दिलेल्या न्यायनिर्णयात 10 वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालेल्या रोजंदारी / तासिका तत्वावरील याचिका कर्त्यांच्या सेवा नियमित करणेबाबत आदेश दिले आहेत .

यामध्ये शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांपैकी मा.उच्च न्यायालयाने ठरवून दिलेले निकष पुर्ण करणाऱ्या शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना शासन निर्णय दि.12.04.2022 नुसार शासकीय सेवेत नियमित करण्यात आले आहेत .त्याच धर्तीवर उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या रिट याचिका 529/2019 ,2722/2019 , 3275 / 2019 ,3274 / 2019 , 37023 / 2018 व 5323/2020 या याचिकांप्रकरणी  मा. उच्च न्यायालय यांनी दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने सदर याचिकांमधील याचिका कर्त्यांच्या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित करण्यात आली आहे .

आदिवासी विकास विभागाच्या सुधारित आकृत्तीबंधानुसार गट – ड संवर्गातील काही संवर्ग मृत घोषित करण्यात आले आहेत . तथापि गट – ड संवर्गातील रोजंदारी तत्वावर असलेले कर्मचारी हे आकृत्तीबंध निश्चित होण्यापूर्वीपासून असल्याने त्यांच्या सेवा सदर मृत संवर्गात नियमित करण्यात यावे असे असे आदेश देण्यात आले आहेत . या संदर्भातील आदिवासी विकास विभागाचा दि.02.12.2022 रोजीचा सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा .

शासन निर्णय

कर्मचारी विषयक , भरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेटसाठी Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा


Leave a Comment