Shasan Nirnay : सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.02.12.2022

Spread the love

जिल्हा परिषदेच्या वर्ग – 3 व वर्ग – 4 कर्मचाऱ्यांच्या आंतरजिल्हा बदलीबाबत शासन परिपत्रक दि.29.09.2021 अन्वये सुधारित धोरण निश्चित करण्यात आले आहेत .त्यानुसार सन 2017 ते 2022 या कालावधीमध्ये संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने आंतरजिल्हा बदली झालेल्या व अद्याप मूळ जिल्हा परिषदेने कार्यमुक्त न केलेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करणेबाबत ग्रामविकास विभागाचा अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय दि.02.12.2022 रोजी निर्गमित झालेला आहे .

सन 2017 ते 2022 या कालावधीमध्ये संगणकीय पद्धतीने पार पडलेल्या जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली प्रक्रिये अंतर्गत बदली झालेल्या सर्व जिल्हा परिषदांतील शिक्षकांना कार्यमूक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत . सन 2017 ते 2022 या कालावधीमध्ये केवळ संगणकीय पद्धतीने पार पडलेल्या जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली प्रक्रिये अंतर्गत बदली झालेल्या व अद्याप पर्यंत कार्यमुक्त न केलेल्या शिक्षकांची बदलीवर्ष निहाय व विद्यमान जिल्ह्यातील सेवाजेष्ठतेनुसार यादी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत .सदर वर्ष निहाय जिल्ह्यातील सेवाज्येष्ठता विचारात घेवून आंतरजिल्हा बदली प्रक्रिये अंतर्गत बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत .

विद्याथ्यांचे हित विचारात घेवून दि.01.04.2023 ते दि.30.04.2023 पर्यंत शिक्षकांच्या कार्यमुक्तीबाबतचे प्रशासकीय आदेश निर्गमित करण्याचे आदेश सदर निर्णयान्वये देण्यात आलेले आहेत .सदरची नियमावली सन 2017 ते सन 2022 या कालावधीत केवळ संगणकीय पद्धतीने पार पडलेल्या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेसाठी लागु राहणार आहे .या संदर्भातील ग्रामविकास विभागाचा दि.02.12.2022 रोजीचा सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा .

शासन निर्णय

कर्मचारी विषयक , भरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेटसाठी Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा


Leave a Comment